U19 World Cup 2024 AUS vs PAK esakal
क्रीडा

U19 World Cup 2024 AUS vs PAK : ती 36 सेकंद सर्व काही सांगून गेली... मॅकमिलचा चौकार अन् पाकिस्तानी जागेवरच बसले

U19 World Cup 2024 AUS vs PAK : पाकिस्तानने शेवटपर्यंत सामना सोडला नव्हता मात्र लक त्यांच्या बाजूने नव्हते.

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup 2024 AUS vs PAK : आयसीसी 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 ची दुसरी सेमी फायनल ही जबरदस्त झाली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा अवघ्या 1 विकेट्सने पराभव करत फायनल गाठली. पाकिस्तानने 180 धावांचे छोटे आव्हान डिफेंड करताना कांगारूंना चांगलाच घाम फोडला होता. मात्र राफ मॅकमिलनने 19 धावांची महत्वपूर्ण खेळी करून कांगारूंना विजय मिळवून दिला.

मोहम्मद जिशान टाकत असलेल्या शेवटच्या षटकात 3 धावांची गरज असताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅकमिलनच्या बाद होता होता वाचला मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन सीमारेषेच्या पार पोहचल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पाकिस्तानच्या संघ उद्ध्वस्त झालेला दिसला. जसा चेंडू सीमापार गेला पाकिस्तानचे सर्व खेळाडू मैदानावरच बसले. निराश झालेल्या खेळाडूंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला 179 धावांमध्ये रोखले होते. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने 6 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून अझान अवैस आणि अराफत मिनहास यांनी प्रत्येकी 52 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानला 179 धावात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया हा सामना आरामात जिंकले असे वाटले होते. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत एका-एका धावेसाठी कांगारूंना झुंजवले. त्यांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अली रझाने 4 तर अराफत मिनहासने दोन विकेट्स घेतल्या. कांगारूंची अवस्था 9 बाद 164 धावा अशी केली. अखेर मॅकमिलनने 19 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 11 फेब्रुवारीला अंतिम सामना होणार आहे. भारताने आतापर्यंत 5 वेळा 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला आहे. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय वरिष्ठ संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी युवा संघाकडे आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Maharashtra Latest News Update: पोलिस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त मुख्याध्यापकास लुटले

SCROLL FOR NEXT