UEFA Euro 2020 Round of 16 Italy vs Austria : युरो कप स्पर्धेत तिसऱ्यांदा आणि नॉक आउटमध्ये पहिल्यांदा पोहचलेल्या ऑस्ट्रियाने स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इटलीला चांगलेच दमवले. ज्या इटलीने मागील 11 सामन्यात एकही गोल होऊ दिला नाही त्या इटलीला या सामन्यात गोलही सोसावा लागला. ऑस्ट्रियाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला असला तरी त्यांचा खेळ कौतुकास्पद पात्र होता. स्पर्धेतील पहिला गोल तसा त्यांनीच डागला. पण ऑफ साईडमुळे तो गोल कॅन्सल झाला.
या सामन्यातील 90 मिनिटाच्या खेळात इटलीचा संघ 2-3 गोल सहज डागेल, असा अंदाज चाहत्यांना होता. काहींनी तर या सामन्यात काही मजा नाही, म्हणूत पाठही फिरवली असेल, पण ऑस्ट्रियाने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले. स्टेडियमवर उपस्थितीत त्यांच्या चाहत्यांचा उत्साह हा काही औरच होता.
त्यातीलच एक चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनच्या वेम्ब्ले स्टेडियमवर इटली-ऑस्ट्रिया यांच्यातील रंगतदार सामना पाहाण्यासाठी आलेल्या आणि ऑस्ट्रियाला सपोर्ट करणाऱ्या सुंदर तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यांनी हा सामना पाहिला नाही त्याने या तरुणीची अदाकारी मिस केली, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
एवढेच नाही तर या तरुणीला पाहिल्यानंतर ऑस्ट्रियाने जिंकावे, असे वाटत होते, अशा भावनाही काही नेटकरी व्यक्त करत आहेत. ही तरुणी नेमकी कोण याची ओळख पटणे मुश्कील असले तरी तिच्या सौंदर्याचे चांगलेच कौतुक नेटकऱ्यांकडून होत आहे. सामना इटलीने जिंकला आणि लाखो नेटकऱ्यांची मनं या ऑस्ट्रियाच्या सौंदर्यवतीनं जिकंली, असेच काहीसे चित्र सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
इटली आणि ऑस्ट्रिया यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा रंगतदार झाला. पहिल्या दोन हाफमध्ये सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर नॉक आउट राउंडमधील नियमानुसार 15-15 मिनिटांच्या दोन हाफमध्ये पुन्हा खेळ रंगला. एक्स्ट्रा टाईममधील पहिल्याच हाफमध्ये इटलीने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमधील अखेरच्या काही मिनिटात ऑस्ट्रियाने प्रत्युउत्तरादाखल एक गोल डागला. पण सामन्यात बरोबरी करुन निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये नेण्यास ते अपयशी ठरले. त्यांनी सामना गमावला असला तरी कडवी झुंज देत आपल्या चाहत्यांना आनंद दिला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य अवस्थेत सुटल्यानंतर प्रेक्षक गॅलरीत बसलेली ऑस्ट्रेयाची चाहती टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाले. तिचा फोटो तुफान व्हायरल होताना दिसतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.