UEFA Nations League Football Hungary Give England His Biggest Defeat In Home After 1928
UEFA Nations League Football Hungary Give England His Biggest Defeat In Home After 1928 esakal
क्रीडा

Nations League Football : इंग्लंडचा 1928 नंतर मायदेशातला मोठा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

वॉल्वरहॅम्पटन : इंग्लंडला नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मायदेशात हंगेरीकडून 4 - 0 अशा मोठ्या पराभवला सामोरे जावे लागले. 1928 नंतरचा इंग्लंडचा हा मायदेशातील सर्वात मोठा पराभव आहे. गेल्या वर्षी युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या इंग्लंडला हंगेरीकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. यामुळे इंग्लंडचे फुटबॉल चाहते संघावर चांगलेच भडकले. याचबरोबर युरोपियन चॅम्पियन इटलीसाठी देखील आजचा दिवस चांगला नव्हता. जर्मनीने त्यांचा 5 - 2 असा पराभव केला. (Nations League Football Hungary Give England His Biggest Defeat In Home After 1928)

पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन म्हणाला, 'गेल्या काही वर्षातील ही आमची सर्वात मोठी हार आहे. हा पराभव विसरून आम्हाला पुढे जावे लागणार आहे.' आजच्या सामन्यात हंगेरीच्या रोलँड सलाईने 16 व्या मिनिटाला पहिला गोल केला. सलईने त्यानंतर 70 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात 2 - 0 अशी आघाडी घेतली.

त्यानंतर जसोल्टने तिसरा गोल केला तर डॅनियल गाजदैगने हंगेरीसाठी चौथा गोल करत इंग्लंडचा 4 - 0 असा पारभव केला. 94 वर्षापूर्वी इंग्लंडला मायदेशात स्कॉटलँडकडून 5 - 1 अशा मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर आज हंगेरीने इंग्लंडला त्यांच्यात देशात 4 - 0 अशी मात दिली.

दुसरीकडे इटली वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यात आलेले अपयश अजून पचवत आहे तोपर्यंतच जर्मनीने त्यांचा 5 - 2 असा दारूण पराभव करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. जर्मनी एकवेळ 5 - 0 असा आघाडीवर होता. मात्र इटलीने नंतर दोन गोल करत आपला पराभव छोटा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार - रिपोर्ट

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT