Umran Malik ind vs ban sakal
क्रीडा

Umran Malik : उमरान मलिकमुळे बांगलादेशमध्ये भीतीचे वातावरण! एक बोल्ड अन् दुसरा...

बांगलादेशात उमरान मलिकने केला कहर! वाचण्यासाठी सपशेल लोटंगण

Kiran Mahanavar

Umran Malik IND vs BAN : उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना पुन्हा एकदा घाबरवले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना मीरपूर येथे खेळला जात आहे. यजमान 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत. मालिकेत टिकण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्त लिहिपर्यंत संघाने 32 षटकांत 6 बाद 126 धावा केल्या होत्या. आतापर्यंत मोहम्मद सिराजने 2, उमरानला एक आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला डावाच्या 12व्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. षटकातील तिसरा चेंडू त्याने टाकला. त्याचा वेग ताशी 150 किमी इतका होता. ते टाळण्यासाठी शकीब अल हसन वाकला, पण चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. यानंतर केएल राहुल त्याच्या जवळ पोहोचला आणि त्याच्याशी बोलला. यानंतर वैद्यकीय पथकाच्या तपासणीनंतर शकीबने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली.

उमरान मलिकने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नजमुल हसन शांतोला बाद केले. या चेंडूचा वेग ताशी 151 किमी होता आणि बॅटरला तो समजू शकला नाही. नुकतेच उमरानने न्यूझीलंड मालिकेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा त्याचा एकूण चौथा एकदिवसीय सामना आहे. या सामन्यापर्यंत त्याने 3 वनडेत 3 बळी घेतले आहेत. 66 धावा देत 2 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

उमरानने आतापर्यंत 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादने एकूण 33 टी-20 सामन्यांमध्ये 45 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत 5 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT