Umran Malik Selected in Indian Cricket Team esakal
क्रीडा

उमरान मलिक आता भारताची 'स्टेन गन', दक्षिण आफ्रिकेविरूद्ध धडाडणार

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा झाली आहे. निवडसमितीने या मालिकेसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. सर्व क्रीडा रसिक ज्या खेळाडूंची संघात निवड व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत होते त्या जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकची (Umran Malik) संघात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता डेल स्टेनच्या छत्रछायेखाली तयार होत असलेला सनराईजर्स हैदराबादची ही स्टेन गन आता भारताची स्टेन गन होणार आहे.

सनराईजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमारन मलिकच्या (Umran Malik) कामगिरीने सर्वजण चांगलेच प्रभावित झाले आहेत. उमरान आयपीएलमध्ये सातत्याने 150 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करत होता. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात तर त्याने 157 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला होता. उमरान फक्त वेगात चेंडू टाकत नाही तर यंदाच्या हंगामात त्याने तब्बल 21 विकेट देखील घेतल्या आहेत. सध्या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या दमाच्या खेळाडूंचा टी 20 संघात भरणा आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ पुढील प्रमाणे :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विराही, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT