IPL 2023 Auction Uncapped Player esakal
क्रीडा

IPL 2023 Auction : जम्मूच्या विवरांतवर पदार्पणातच 2 कोटींची बोली; 'या' अनकॅप्ट खेळाडूंनी लिलाव गाजवला

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Auction Uncapped Player : आयपीएल 2023 लिलावात इंग्लंडच्या सॅम करनवर 18.50 कोटी रूपयांची बोली लागली. आयपीएल इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च बोली आहे. यंदा मिनी लिलावात फ्रेंचायजींनी विदेशी खेळाडूंवर मोठीमोठ्या बोली लावल्या. मात्र भारतीय खेळाडू किंवा अनकॅप्ट खेळाडूंचा लिलाव सुरू झाल्यावर त्यांनी हात आखडता घेतल्याचे दिसले. त्यातही भारताच्या काही अनकॅप्ट खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली.

शिवम मावी 6 कोटी

भारतीय अनकॅप्ट खेळाडू सुरू झाल्यानंतर फ्रेचायजींनी आखडता हात घेतला होता. मात्र अखेर शिवम मावीसाठी चुरशीने बोली लागवण्यात आली. अखेर गुजरात टायटन्सने शिवम मावीला तब्बल 6 कोटी रूपये खर्चून खरेदी केले.

मुकेश कुमार 5.50 कोटी

मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांनी जोरदार बॅटिंंग केली. अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 5.50 कोटीत खरेदी केले. मुकेश कुमार हा आयपीएलचा कोणताही करार हातात नसतानाही भारतीय संघात निवडला गेला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जरी त्याल अनकॅप्ट खेळाडू म्हणता येत नसले तरी त्याने अखेर आयपीएलचा करार मिळावला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 5.50 कोटी रूपये बोली लावत आपल्याकडे खेचले.

विवरांत शर्मा 2.6 कोटी

जम्मू काश्मीरच्या विवरांत शर्माला आयपीएल लिलावात 2.6 कोटी रूपयांची बोली लागली. त्याच्यासाठी केकेआरने बोली लावली होती. 23 वर्षाच्या विवरांतने टी 20 क्रिकेटमध्ये 8 सामन्यात 191 धावा आणि 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने लिस्ट A सामन्यात देखील 14 सामन्यात 519 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. तो डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. तो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

सॅमसंगने लाँच केले तीन नवे Foldable फोन! Galaxy Z Fold Ultra, Z Fold 8 अन् Z Flip 8; दमदार फीचर्स, किंमत फक्त...

'धुरंधर' फेम अभिनेत्री आयशा खानला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात? महिला पोलिसांनी हात ओढल्याचा व्हिडिओ शेअर करत केला आरोप

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT