Union Budget 2023 Sports esakal
क्रीडा

Union Budget 2023 Sports : क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; मिळणार 3397 कोटी

अनिरुद्ध संकपाळ

Union Budget 2023 Sports : येत्या वर्षात भारत एशियन गेम्समध्ये सहभागी होणार आहे. तसेच 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील खेळाडूंना तयारी करायची आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी वाढीव निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाला जवळपास 3 हजार 397.32 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा क्रीडा क्षेत्राला 723.97 कोटी रूपये वाढीव निधी मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये (revised) क्रीडा क्षेत्राला 2,673.35 कोटी रूपयांचा तरतूद करण्यात आली होती.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पहिल्यादा क्रीडा क्षेत्रासाठी 3,062.60 कोटी रूपये तरतूद करण्यात आले होते. मात्र रिव्हाईज अर्थसंकल्पात निधीची तरतूद कमी करून 2,673.35 कोटी रूपये करण्यात आली होती. याचे कारण बहुदा हांगझहोयू एशियन गेम्स पुढे ढकलले गेल्यामुळे निधीला कात्री लावण्यात आली. आता हाच निधी यंदाच्या अर्थसंकल्पात वाढीव निधी म्हणून देण्यात आला आहे.

क्रीडा मंत्रालयाचा सर्वात महत्वाचा उपक्रम खेलो इंडियाला सरकार जास्त प्राधान्य देत आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी 1,045 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद 606 कोटी रूपये इतकी होती. आता त्यात 439 कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे. या उपक्रमाचा फायदा ऑलिम्पिक आणि एशियन गेम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चांगले खेळाडू तयार करण्यात झाला आहे.

याचबरोबर स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया (SAI) साठी देखील 36.09 कोटींचा वाढीव निधी यंदाच्या अर्थसंकल्पात दिला आहे. यंदा SAI साठी 785.52 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT