urvashi rautela-naseem shah sakal
क्रीडा

Urvashi-Naseem : आमचं तसं काय नाय! चुकून शेयर झाला तो व्हिडिओ...उर्वशीनं कसबसं सावरलं

माझ्याकडून चुकूनच...नसीमच्या व्हिडिओवर उर्वशी बोलली...

Kiran Mahanavar

Urvashi Rautela-Naseem Shah : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्याने अंतिम फेरीच्या शर्यतीतून पडावे लागले. सुरुवातीला भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. भारतीय चाहत्यांना त्यांच्या संघाकडून खूप अपेक्षा होत्या. भारत-पाक पहिला सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील आली होती. उर्वशी आणि नसीम शाहचा या मॅचनंतर हसतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

उर्वशीही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आली होती. उर्वशी आणि नसीम शाहचे हसतानाचे वेगवेगळे क्षण टिपून चाहत्यांनी एक व्हिडिओ बनवला, जो उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. यानंतर नसीम शाहसोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. आता उर्वशीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर एका स्टोरीमध्ये लिहिले की, दोन दिवसांपूर्वी माझ्या टीमने एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता, जो चाहत्यांनी एडिट केला. आम्हाला माहित नव्हते की आणखी कोण यात सामील आहे. मी मीडियाला विनंती करते कोणतीही बातमी बनवू नका. सर्वांना धन्यवाद!

उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केल्यानंतर चर्चेला उधाण आले. यानंतर नसीम यांनी या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले. व्हिडिओमध्ये उर्वशीबद्दल बोलताना तो म्हणाला की, तुमच्या प्रश्नावर हसू येत आहे कारण उर्वशी कोण आहे. हे मला माहीत नाही. तो कोणत्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल शेअर झाला हे पण मला माहीत नाही. मला सध्या लक्ष फक्त क्रिकेटवर द्यायचं आहे. जर कोणी मला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्लॅन आहे.

नसीमने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 27 धावांत दोन बळी घेतल्या. त्यानंतर त्याने हाँगकाँगविरुद्ध सात धावांत दोन बळी घेतले. त्याचवेळी भारताविरुद्धच्या सुपर-4 मध्ये तो महागडा ठरला. त्याने 45 धावांत एक विकेट घेतली. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 19 धावांत एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT