Urvashi Rautela Rishabh Pant sakal
क्रीडा

Urvashi Rautela Rishabh Pant : उर्वशी भारत-पाक मॅच पाहण्यासाठी आली पण झाला पचका

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत अलीकडेच यांच्यातील वाद खूप चर्चेत आला होता.

Kiran Mahanavar

Urvashi Rautela Rishabh Pant Ind vs Pak Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना दुबईत खेळल्या जात आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतचे स्टार्स दुबईला आले आहेत. सामन्यादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये दिसली. जेव्हा उर्वशी रौतेला येथे दिसली तेव्हा तिचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड झाले. यासोबतच टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचे नावही त्याच्यासोबत जोडले गेले. अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद खूप चर्चेत आला होता.

उर्वशी रौतेला जेव्हा दुबई स्टेडियमवर दिसली, तेव्हा चाहत्यांनी मजेदार मीम्स बनवले आणि लिहिले की उर्वशीच्या आगमनामुळे पंतला संघात स्थान मिळाले नाही. काही चाहत्यांनी लिहिले की, आज ऋषभ पंत संघाबाहेर आहे आणि उर्वशी रौतेला मैदानात आहे, त्यामुळे तिला खूप आनंद होईल. उर्वशीने एका मुलाखतीत 'मिस्टर आरपी'बद्दल एक किस्सा सांगितला होता, त्यानंतर हा वाद सुरू झाला.

उर्वशी रौतेलाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. आरपी मला भेटायला आला होता आणि तो लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. मात्र मी शुटिंगमध्ये व्यग्र होते. नंतर मी थकून झोपले. मात्र मला 16 ते 17 मिसकॉल आले होते. आरपी अनेक तास माझी वाट पाहत होता मात्र मी त्याला भेटू शकले नाही यामुळे मी नाराज होते. त्यानंतर मी त्याला मुंबईत भेटू असे सांगितले. आम्ही मुंबईत भेटलो. मात्र या दरम्यान माध्यमांनी आम्हाला गाठले. त्यानंतर आमचे नाते संपले असेही ती म्हणाली.

ही मुलाखत चांगलीच व्हायरल झाली, प्रतिसादात ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की कोणीतरी खोट बोलत आहे आणि त्याचवेळी त्याने लिहिले की बहिणीला फॉलो करा. दोघांमधील हे इंस्टाग्राम युद्ध बरेच दिवस चर्चेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT