Urvashi Rautela Sindur Photo Fan Connect With Rishabh Pant esakal
क्रीडा

Urvashi Rautela : वर्ल्डकप धोक्यात! उर्वशी रौतेला अन् मांग में सिंदूर...सोशलवर एकच चर्चा

अनिरुद्ध संकपाळ

Urvashi Rautela Sindur Photo Fan Connect With Rishabh Pant : भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी दाखल झाला आहे. या संघासोबत भारताचा डॅशिंग फलंदाजी आणि विकेटकिपर ऋषभ पंत देखील अंतिम 11 च्या संघात स्थान मिळवण्यासाठी कसून सराव करतोय. मात्र उर्वशी रौतेला त्याची काही केल्या पाठ सोडत नाहीये. मध्यंतरी तीने ती ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याची इन्स्टा पोस्ट केली होती. आता तर तिने मांगे में सिंदूर वाला फोटो टाकत एक क्रिप्टिक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टनंतर सोशल मीडियावर उर्वशी आणि ऋषभ पंतीचीच चर्चा सुरू झाली आहे.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात नुकतेच सोशल वॉर झाले होते. दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. पंतने उर्वशीसोबत कोणतेही नाते नसल्याचे सांगितले तर उर्वशी पंतसोबत काहीतरी होतं हे सांगण्याचा प्रयत्न करत होती.

दरम्यान, उर्वशी रौतेलाने एक नवा फोटो आपल्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. उर्वशीने 'मांग में सिंदूर' वाला फोटो शेअर करत त्याला 'सिंदूरशिवाय प्रीय काय असू शकत नाही. पूर्ण रिती रिवाजासहीत ते पाहिजे, आयुष्यभराची साथ हवी.' असे कॅप्शनही दिले.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी अशीच एक पोस्ट केली होती. त्याला 'कसं विसरू मरण मनुष्याला येतं आठवणींना नाही.' असं दर्दभरं कॅप्शन दिलं होतं. 'कोणी इतकं कसं निष्ठुर होऊ शकतं, कोणाला एखाद्याच्या झुरण्यावर दयाच येऊ नये.' असे म्हणत उर्वशीने एक उदास मुद्रेतला फोटो देखील शेअर केला होता.

उर्वशीने एक इन्स्टा पोस्ट करून तर कळस गाठला. तिने ' मी माझ्या ह्रदयाचा पाठलाग करतेय! आणि ते मला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेला.' अशा कॅप्शनसह #UR1 असा क्रिप्टिक हॅशटॅग वापरून विमानातील आपला फोटो शेअर केला होता.

यावर नेटकऱ्यांनी तुफान मीम्स व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे. एकाने तर आता वर्ल्डकप धोक्यात आला आहे अशी पोस्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EWS अन् राज्याचं 10 टक्के आरक्षण नको, शिकलेल्या मराठ्यांनी जाहीर कराव; छगन भुजबळांचं आव्हान

'खाकी अंगावर घातली की जात-धर्म विसरा'; अकोला दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्याचे Supreme Court ने का दिले आदेश?

Viral Video: आजीने आजोबाचे लावून दिले दुसरे लग्न, नातीने कारण विचारताच मिळाले 'हे' उत्तर; ऐकून डोळे पाणावतील, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Beed Crime : माजी उपसरपंच प्रकरणात धक्कादायक वळण; बार्शी तालुक्यात कारमध्ये मृतदेह सापडला, नातेवाइकांचा संशय

Mumbai Pollution: धूळ नियंत्रणासाठी कठोर नियमावली, हिवाळ्यापूर्वी लागू करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT