US Open 2022 Serena Williams In Her Last Tournament Won First Match On Home Ground  esakal
क्रीडा

US Open : शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या सेरेना विलियम्सची विजयी सुरूवात

अनिरुद्ध संकपाळ

US Open 2022 Serena Williams : दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स आपल्या कारकिर्दितील शेवटची स्पर्धा खेळत आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सेरेनाने आपली घरची ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपनची सुरूवात विजयाने केली. सेरेना क्रमवारीत 80 व्या स्थानावर असलेल्या दांका कोविनिचचा 6 - 3, 6 - 3 असा दोन स्टोमध्ये पराभव केला. सहा वेळीची युएस ओपन विजेती आणि 23 ग्रँडस्लॅम आपल्या नावावर करणाऱ्या सेरेनाने विजयानंतर 'ज्यावेळी मी कोर्टवर उतरली त्यावेळी प्रेक्षकांनी जबरदस्त स्वागत केले. मी खूप भारावून गेले. मी कधीही हे विसरणार नाही.' अशी प्रतिक्रिया दिली.

सेनेना विलियम्सचा हा सामना पाहण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा, माईक टायसन, सेरेना विलियम्सची आजी आणि वडील आपल्या मुलीसोबत हजर होते. सेरेनाने 1999 मध्ये 17 व्या वर्षी पहिले टायटल जिंकले होते. सेरेना सोबतच गेल्या वर्षीची युएस ओपन विजेती बियांका आंद्रेस्कू, अँडी मरे, डॅनिल मेदवेदेव, कोको गौफ देखील दुसऱ्या फेरीत पोहचले आहेत. मात्र सर्वांची नजर सेरेनाच्या सामन्यावर होती.

सेरेना पहिला सामना जिंकल्यानंतर म्हणाली, 'मी या कोर्टवर सहतरित्या खेळू शकते. मी ज्यावेळी या कोर्टवर उतरते त्यावेळी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करते. इथले प्रेक्षक जबरदस्त आहेत त्यामुळे मला याचा फायदा होतो.' आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत सेरेना विलियम्स म्हणाली की, 'निवृत्ती घेण्याचा निर्णय खूप अवघड होता. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीवरू खूप प्रेम करता त्याच्यापासून दूर होणे फार अवघड असते. मात्र आता वेळ आली आहे. आयुष्यात आता दुसरे काही करणे गरजेचे आहे. आता सेरेना 2.0 असेल.'

यंदाच्या युएस ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीत युक्रेनच्या 20 वर्षाच्या दारिया स्निगूरने रोमानियाच्या सिमोना हालेपला पराभवाचा धक्का दिला आहे. आपल्या तिसऱ्या WTA सामन्यात स्निगूने हालेपचा 6-2,0-6, 6-4 असा पराभव केला. स्निगूनने सामना झाल्यावर, 'मी खूप खूष आहे. मी थोडी नर्वस होते. मात्र मी माझी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.' अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT