US Open 2023 : 
क्रीडा

US Open 2023 : जोकोविचने जिंकलं 24वं ग्रँडस्लॅम विजेतेपद! यूएस ओपनच्या फायनलमध्ये मेदवेदेवचा केला पराभव

रोहित कणसे

नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. चुरशीच्या लढतीत सर्बियाच्या ३६ वर्षीय अनुभवी खेळाडूने ६-३, ७-६ (७-५), ६-३ असा विजय मिळवला.

जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यात एक तास ४४ मिनिटे चुरशीची लढत झाली. जोकोविचने हा सेट ७-६ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने मेदवेदेवचा ६-३ असा पराभव करत विजय मिळवला.

जोकोविचचे यूएस ओपनचे चौथे विजेतेपद

दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेला जोकोविच दुसऱ्या सेटमध्ये थोडा अडचणीत आल्यासारखा वाटला पण त्याने सामन्यात पुनरागमन करत चौथे यूएस ओपन जेतेपद पटकावले. या वर्षाच्या सुरुवातीला जोकोविचने राफेल नदालचा २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला होता. जोकोविचला जुलैमध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, त्याने २०२३ मध्ये चारपैकी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत.

जोकोविचने आतापर्यंत ३६ वेळा ग्लँड स्लॅम फायनल खेळला आहे ज्यापैकी २४ विजेतेपद पटकावले आहे. तो १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरला आहे. फ्रेंच ओपनचे जेतेपदही तीन वेळा जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT