joe biden america us joe biden america us
क्रीडा

अमेरिकेचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीनची प्रत्युत्तराची धमकी

अमेरिकेची बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार घालण्याची तयारी; चीनची प्रत्युत्तर देण्याची धमकी

अनिरुद्ध संकपाळ

बिजिंग : जो बायडेन प्रशासनाने सोमावारी अमेरिकेचे सरकारी अधिकारी बिजिंग येथे होणाऱ्या विंटर ऑलिम्पिकवर ( Beijing Winter Olympics ) बहिष्कार घालण्याचे जाहीर करण्याची घोषणा केली. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला चीन ( China ) प्रत्युत्तर देईल असे सांगितले.

जो बायडेन प्रशासनाने चीनमधील सुरु असलेला नरसंहार आणि मानतेविरुद्ध सुरु असलेली कारवाई याचा निषेध नोंदवण्यासाठी अमेरिकेचे अधिकृत शिष्टमंडळ बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर ( Beijing Winter Olympics ) बहिष्कार घालेल असे जाहीर केले. हा एक राजनैतिक बहिष्कार असेल. अशा प्रकाराचा बहिष्कार घालावा यासाठी गेल्या काही आठवड्यापासून अमेरिकेतील काँग्रेसचे काही सदस्य मागणी करत होते. पण, या बहिष्काराचा अमेरिकेच्या खेळाडूंवर कोणताही परिणाम होणार नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ) यांनी गेल्या महिन्यात अशा प्रकाराचा राजनैतिक बहिष्कार घालण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितले. हा बहिष्कार चीनमधील मानवाधिकार उल्लंघनाचे रेकॉर्ड पाहता आणि चीनमध्ये अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायविरुद्ध जो नरसंहर सुरु आहे त्याच्या विरोधात असणार आहे.

दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री लिजियान यांनी 'जे कोण हा बहिष्काराची भाषा करत आहेत ते चीन ( China ) आणि अमेरिकेमध्ये आयात सुरळीत व्हावा यासाठी सुरु असलेल्या चर्चांमध्ये अडथळा निर्माण करत आहेत.' असे धमकीवजा वक्तव्य केले.

पत्रकार परिषदेत बोलताना लिजियान पुढे म्हणाले की, 'जर अमेरिकेने आपली बहिष्काराची भुमिका ठाम ठेवली तर चीन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT