Valentine's Day Marcus Stoinis Adam Zampa  esakal
क्रीडा

Valentine's Day : BBL ने व्हॅलेंटाईन डे स्पेशल फोटो केला शेअर, झाम्पाने स्टॉयनिसचा घेतला मुका

अनिरुद्ध संकपाळ

Valentine's Day Marcus Stoinis Adam Zampa : जगभरात व्हॅलेंटाईन डेची चांगलीची धामधूम पहावयास मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हॅलेंटाईन डे स्पेशल पोस्ट व्हायरल होत आहे. क्रीडा जगतही हा प्रेमाचा दिवस जोरदार सेलिब्रेट करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील टी 20 लीग बिग बॅशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बिग बॅश लीगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी ऑस्ट्रेलियाचे स्टार क्रिकेटपटू अॅडम झाम्पा आणि मार्कस स्टॉयनिस यांचा ब्रोमान्स करतानाचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत झाम्पा स्टॉयनिसच्या गालवर किस करताना दिसतोय. याला बिग बॅशने 'हॅप्पी व्हॅलेंटाईन डे' असे कॅप्शन देत ग्रीन हार्टचा इमोजी देखील शेअर केला आहे.

बिग बॅश लीगने व्हॅलेंटाईन डेला स्टॉयनिस आणि झाम्पाचा फोटो शेअर करण्याचे एक महत्वाचे कारण आहे. या दोघांचे नाते खूप खास आहे. मग तो ऑस्ट्रेलियाचा संघ असो किंवा बिग बॅश मधील त्यांची केमेस्ट्री असो. या दोघांचा ब्रोमान्स हा क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये कायम चर्चेचा विषय असतो.

हे दोघेही कॅमेऱ्यासमोर ब्रोमान्स करताना कधीही लाजत नाहीत. अनेकवेळा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या ब्रोमान्सचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर अमेझॉन प्राईमने एक डॉक्युमेंटरी देखील केली होती. यावेळी देखील या दोघांचा ब्रोमान्स दाखवण्यात आला होता. दोघेही एकत्रच होते. या डॉक्युमेंटरीमधील लव्ह कॅफे या सेक्शनमध्ये स्टॉयनिस झाम्पाच्या रूममध्ये कॉफी करताना दिसले होते.

क्रिकेट वर्तुळात स्टॉयनिस आणि झाम्पाच्या नात्याची जोरदार चर्चा असते. मात्र हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. झाम्पाने आपल्या दीर्घ काळच्या मैत्रिणीसोबत 2021 मध्ये लग्न केले. त्यावेळी मार्कस स्टॉयनिसला नेटकऱ्यांची चांगलेच ट्रोल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT