World’s first vegetarian professional bodybuilder Varinder Singh Ghuman, who inspired millions with his fitness journey, tragically passed away due to a heart attack.

 

esakal

क्रीडा

Varinder Singh Ghuman death : धक्कादायक! जगातील पहिला शाकाहारी ‘प्रोफेशनल बॉडीबिल्डर‘ वरिंदर सिंह घुमनचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू

Who Was Varinder Singh Ghuman? : बॉडीबिल्डरचा वरिंदर सिंह घुमनने "टायगर ३" या चित्रपटात सलमान सोबतही केलं होतं काम

Mayur Ratnaparkhe

World’s first vegetarian professional bodybuilder Varinder Singh Ghuman dies of heart attack: भारताच्या बॉडीबिल्डिंग क्षेत्रातून आणि याचबरोबर पंजाबी चित्रपटसृष्टीतूनही एक दुःखद बातमी समोर आली आहे. जगातील पहिला शाकाहारी प्रोफेशनल  बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंह घुमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे, बॉडीबिल्डिंग क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्यांसाठी वरिंदर सिंह घुमन हा प्रेरणा होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठ्याप्रमाणावर होता.

प्राप्त माहितीनुसार वरिंदर सिंह घुमन खांद्याच्या दुखापतीसाठी किरकोळ ऑपरेशन करण्यासाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात गेला होता. यावेळी तो एकटाच घरातू गेला होता. हे किरकोळ ऑपरेशन असल्याने तो आजच परतणार होता, परंतु अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.

वरिंदर "टायगर ३" चित्रपटात सलमान खानसोबत दिसला होता. त्याच्या बॉडीबिल्डिंग कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले होते. तसेच वरिंदर एक प्रसिद्ध फिटनेस उत्साही होता. त्याने 'मिस्टर इंडिया २००९चा किताब जिंकला होता. शिवाय, 'मिस्टर एशिया चॅम्पियनशिप' मध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याला 'द ही-मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जात असे. वरिंदरला अभिनयाचीही आवड होती.

याशिवाय वरिंदर हा जगातील पहिला शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर होता. तो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस(IFBB) प्रो कार्ड मिळवणारा पहिला भारतीय बॉडीबिल्डर होता. एवढंच नाहीतर अमेरिकन अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरने आशियामध्ये त्याच्या आरोग्य उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी वरिंदरला नियुक्त केले होते तसेच वरिंदर त्याच्या उत्पादनांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला होता.

वरिंदरला केवळ फिटनेसमध्येच नाही तर अभिनयातही रस होता. त्याने अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. "कबड्डी वन्स अपॉन" हा एक पंजाबी चित्रपट होता ज्याने त्याला एका रात्रीत स्टार बनवले होते. या चित्रपटाने वरिंदरचे अभिनयात पदार्पण केले होते. तसेच, वरिंदरने "रोअर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्स" या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर, वरिंदर "मरजावां" मध्येही दिसला तर "टायगर ३" मध्ये सलमान खानसोबत त्याला पाहून चाहते कमालीचे आनंदित झाले होते. वरिंदर अनेकदा त्याचे वर्कआउट व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असे. इंस्टाग्रामवर त्याचे दहा लाख फॉलोअर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA , 2nd Test: जैस्वाल लढला, पण सुदर्शन, जुरेल, पंत मात्र फेल; भारताचा अर्धा संघ तंबूत, फॉलोऑन टाळण्याचं आव्हान

Kolhapur : आमचं गाव नाही का, विमानानं जाणारीच माणसं आहेत काय? रस्त्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक, विमानतळावर आंदोलन

Latest Marathi News Live Update : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमात पडलेल्या मुलीकडून घरात चोरी! ११ लाख पळवल्यावर आई वडिलांनी केलेलं माफ; पुन्हा दागिन्यांवर डल्ला

Sinhagad Fort: खासदार नीलेश लंकेंचा पुढाकार! सिंहगडावर ‘आपला मावळा’कडून स्वच्छता; शेकडो शिवभक्तांचा सहभाग..

SCROLL FOR NEXT