Team India Squad  sakal
क्रीडा

Team India Squad : संघाची घोषणा झाली अन् 'या' खेळाडूंची कारकीर्दच संपली!

गेल्या वर्षी टी-20 world cup मध्ये हा खेळाडू संघाचा भाग होता.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 World Cup 2022 : भारतीय निवडकर्त्यांनी T20 विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. विराट कोहली-रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर अर्शदीप सिंगसारख्या युवा खेळाडूंनाही संधी संघात देण्यात आली आहे, मात्र यावेळी एका जादुई गोलंदाजाला संघातून वगळले आहे. हा खेळाडू गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होता.

आयपीएल 2021 नंतर टी-20 विश्वचषक 2021 खेळला गेला. या विश्वचषकासाठी भारतीय निवड समितीने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला संघात स्थान दिले होते. एकेकाळी असे मानले जात होते की हा मिस्ट्री बॉलर टीम इंडियाचे भविष्य आहे. पण त्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप राहिला. त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कप 2021 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. वरुणने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते, पण तो आपल्या खेळाची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला.

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. टीम इंडिया या विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली होती, ज्यासाठी वरुण चक्रवर्ती जबाबदार मानले जाता होते. आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने 6 सामन्यात 2 बळी घेतले आहेत. त्याचवेळी त्याच्या नावावर 42 आयपीएल सामन्यात 42 विकेट आहेत.

वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2021च्या बळावर आपली छाप पाडली होती. मात्र तो यंदाच्या आयपीएलमध्येही फ्लॉप राहिला होता. त्यामुळे त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत. या हंगामात वरुण चक्रवर्तीने 11 सामन्यांत केवळ 6 विकेट घेतल्या होत्या. गेल्या हंगामात चक्रवर्तीने 17 सामन्यात 18 विकेट घेतल्या होत्या.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT