क्रीडा

Women T20 Challenge : माया सोनवणेची अतरंगी बॉलिंग अ‍ॅक्शन व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

पुणे : महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेत आज सुपरनोव्हा आणि व्हिलॉसिटी यांच्यात सामना रंगत आहे. व्हिलॉसिटीने नाणेफेक सुपरनोव्हाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मात्र सुपरनोव्हाची सुरूवात खराब झाली. केट क्रॉस आणि दिप्ती शर्मा यांनी मिळून सुपरनोव्हाची अवस्था 3 बाद 18 धावा अशी केली. मात्र त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तानिया भाटिया यांनी डाव सावरला.

अखरे ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार दिप्ती शर्माने 11 व्या षटकात लेग स्पिनर माया सोनवणेला पाचारण केले. तिने आपल्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू टाकल्यानंतरच तिची बॉलिंग अ‍ॅक्शन पाहून अनेकजण अवाक झाले. तिची बॉलिंग अ‍ॅक्शन ही साधारणपणे पॉल अ‍ॅडम्ससारखी आहे. माया सोनवणेने आजच्या सामन्यात दोन षटके टाकली. तिने पहिल्या षटकात पाच तर दुसऱ्या षटकात 14 धावा दिल्या.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुपरनोव्हाने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. खराब सुरूवातीनंतर हरमनप्रीत कौर आणि तानिया भाटियाने चौथ्या विकेटसाठी 82 धावांची दमदार भागीदारी रचली. हरमनप्रीत कौरने 51 चेंडूत 71 धावा केल्या. तर तानिया भाटियाने 32 चेंडूत 36 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT