sourav ganguly dance with daughter sana and wife dona sakal
क्रीडा

VIDEO : लंडनच्या रस्त्यावर सौरव गांगुलीने मुलगी अन् पत्नी सोबत धरला ठेका

लंडनच्या रस्त्यावर डान्स करत होता सौरव गांगुली - व्हिडिओ झाला व्हायरल

Kiran Mahanavar

Sourav Ganguly Birthday in london : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष कुटुंबासह लंडनमध्ये आहेत. तिथे दादाचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खूप चर्चेत पण आहे.

व्हिडिओमध्ये लंडनच्या रस्त्यावर सौरव गांगुलीने मुलगी अन् पत्नी सोबत ठेका धरला आहे. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी गांगुलीच्या डान्स मूव्हचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.(sourav ganguly dance with daughter sana and wife dona)

दादाचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी कोणतेही हॉटेल किंवा बीच नव्हते होते तर लंडनचा एका शांत रस्ता होता. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये दादा खूपच मस्त दिसत आहेत. राखाडी रंगाचे जाकीट, जीन्स आणि टोपी घालून दादा शाहरुख खानच्या गाण्यावर जोरदार नाचत आहे. यामध्ये आजोबा, मुलगी सना, पत्नी डोना आणि जवळचे मित्र डान्स करताना दिसत आहेत.

सध्याचा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये भारताने इंग्लंमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे भारताला जमलेले नाही. या मालिका जिंकणाऱ्या संघात सौरभ गांगुलीचा देखील समावेश होता. तसेच 2002 मध्ये इंग्लंडविरूद्धची नेटवेस्ट ट्रॉफी जिंकण्याचाही पराक्रम टीम इंडियाने सौरभ गांगुलीच्या नेतृत्वातच केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT