Shikhar-Dhawan-Oman 
क्रीडा

Video: ओमानच्या जतिंदर सिंगने 'गब्बर-स्टाईल' सेलिब्रेशन

विराज भागवत

ओमानच्या संघाने एकतर्फी मिळवला विजय

T20 World Cup 2021 ला रविवारपासून सुरूवात झाली. ओमान विरूद्ध पापुआ न्यू गिनी या सामन्याने स्पर्धेची सुरूवात झाली. या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा ओमानने दहा गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीने २० षटकात ९ बाद १२९ धावा केल्या. तर, ओमानने एकही गडी न गमावता १३.४ षटकातच सामना जिंकला. या सामन्यात गिनीकडून असद वल्लाने दमदार अर्धशतक ठोकलं पण तो जेव्हा बाद झाला, त्या घटनेची जास्त चर्चा रंगली. वल्लाचा झेल ज्याने टिपला त्या जतिंदरने शिखर धवन स्टाईलचं सेलिब्रेशन केलं.

असद वल्लाने ४३ चेंडूत ५६ धावा केल्या. कलीमुल्लाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तजिंदरने त्याचा झेल टिपला आणि त्याला माघारी धाडले. हा झेल टिपल्यानंतर त्याने शिखर धवनच्या स्टाईलमध्ये मांडी थोपटून सेलिब्रेशन केले. त्याच्या खेळीच्या जोरावर पापुआ न्यू गिनीने १२९ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना इक्बाल इलियास आणि जतिंदर सिंग यांनी दमदार कामगिरी केली. जतिंदरने ४२ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर इलियासने ४३ चेंडूत नाबाद ५० धावा करत त्याला चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT