पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी लवकरच सासरा होणार आहे. आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा विवाहबंधनात अडकणार असून लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. शाहिद आफ्रिदीचा होणारा जावईही क्रिकेटपटूच आहे. शाहीन शाह आफ्रिदी असं त्याचं नाव आहे. शाहिद आफ्रिदीनं दोन दिवसांपूर्वी शाहीन आणि अक्सा यांच्या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबामध्ये बोलणी सुरु असल्याचं ट्विट केलं होतं. शाहिद आफ्रिदीच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. गोविंदा आणि कादर खान यांच्या दुल्हे राजा या चित्रपटातील सुनो ससुरची या गाण्याचे बोल या व्हिडीओला आहेत.
सोशल मीडियावर गोविंदाच्या 'दुल्हे राजा' या गाण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहीन यानं शाहिद आफ्रिदीला बाद केल्याचं दिसत आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील २०१८ सालचा हा व्हिडीओ आहे. ज्यात शाहीनच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर आफ्रिदीनं जोरदार षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर शाहीन यानं मधला स्टम्प उडवून शाहिद आफ्रिदीला बाद केले. आता आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा आणि शाहीन यांच्या विवाहाची बोलणी सुरु आहेत. आफ्रिदीनं याबाबतची अधिकृत माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ -
२० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०१८ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपमध्ये पदार्पण केलं होतं. शाहीननं २२ एकदिवसीय सामन्यातील २१ डावांत ४५ बळी घेतले आहेत. २१ टी-२० सामन्यात शाहीन यानं २४ फलंदाजांची शिकार केली आहे. १५ कसोटीतील २३ डावांत गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीनं ४८ बळी घेतलेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.