Virat-Jadeja-Master-Plan 
क्रीडा

Video: विराट-जाडेजाचा 'मास्टरप्लॅन'; फिल्डिंग बदलली अन्...

विराज भागवत

इंग्लंडची एक जोडी मैदानात फटकेबाजी करतो होती, त्यावेळी...

Ind vs Eng 4th Test: भारताचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला. भारतानंतर इंग्लंडच्या डावाचीही सुरूवात खराबच झाली. रॉरी बर्न्स (५), हसीब हमीद (०), जो रूट (२१), डेव्हिड मलान (३१) आणि क्रेग ओव्हरटन (१) झटपट बाद झाले. पण ओली पोपने आधी जॉनी बेअरस्टोसोबत आणि मग मोईल अलीसोबत भागीदारी करत संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. मोईन अली चांगल्या लयीत असताना जाडेजा आणि विराट यांनी एक प्लॅन करून त्याला माघारी धाडला. तो व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

मोईन अलीसोबत ओली पोप दमदार खेळ करत होता. मोईन अली 7 चौकारांसह ३७ धावांवर खेळत होता. त्याला रोखणं भारतासाठी गरजेचं होतं. त्यावेळी जाडेजा आणि विराट कोहली यांच्यात मैदानावरच चर्चा रंगली. त्यानंतर त्या दोघांनी प्लॅनिंग केलं आणि फिल्डिंग मध्ये काही बदल केले. त्यानंतर अगदी पुढच्याच चेंडूवर मोईन अली मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद होऊन माघारी परतला.

त्यानंतर ओली पोपने ८१ धावांची खेळी केली. त्याला ख्रिस वोक्सने चांगली साथ दिली. त्यानेही ५० धावांची खेळी केली. अखेर २९० धावांवर इंग्लंडचा संघ बाद झाला आणि त्यांनी पहिल्या डावाअंती ९९ धावांची आघाडी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Protest : 'गोकुळ' वरुन कोल्हापुरात रणकंदन! शासनाच्या अध्यादेशाविरोधात संघर्ष मोर्चा, गावागावांतून हजारो मोर्चेकरी दाखल

Team India Update : गौतम गंभीरच्या टीममध्ये दोन गट पडणार; IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वाच्या हालचाली... नेमकं काय घडलं?

Ahilyanagar News: नेवाशाच्या विकासासाठी ५९.४० कोटींची मंजुरी; विठ्ठल लंघे यांच्या पाठपुराव्याला यश ; कुंभमेळ्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजळले

Gold Rate Today: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; चांदीही झाली स्वस्त, पाहा प्रमुख शहरांतील आजचे दर

सुनांचा सासूबाईंसोबत सेल्फी अन्... दिवाळीनिमित्त एकत्र आलं देशमुख कुटुंब; रितेशने शेअर केले फोटो, चाहते म्हणतात- नजर ना लागो

SCROLL FOR NEXT