Vijay Hazare Trophy 2023 esakal
क्रीडा

Vijay Hazare Trophy 2023 : झारखंडचा विदर्भाकडून दहा विकेटनी धुव्वा

अनिरुद्ध संकपाळ

Vijay Hazare Trophy 2023 Vidarbha Vs Jharkhand

नागपूर, ता. २९ : विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ‘ब’ गटात विदर्भाची विजयी मालिका कायम असून त्यांनी झारखंडचा दहा विकेटनी धुव्वा उडवत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. जयपूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विदर्भ संघ आता १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

यश ठाकूर, दर्शन नळकांडे आणि अक्षय कर्णेवारच्या गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने झारखंडचा डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला. झारखंडकडून अनुकूल रॉयने सर्वाधिक २५ धावा केल्या. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने झारखंडचे तीन फलंदाज बाद केले.

‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या दर्शन नळकांडेने आपली चमकदार कामगिरी कायम ठेवताना दोन गडी टिपले. प्रत्युत्तरात विदर्भाने केवळ १३.४ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. कर्णधार अथर्व तायडेने ४६चेंडूंचा सामना करताना नाबाद ७० धावांची खेळी केली. त्यात त्याने दहा चौकार व एक षटकार मारला.

अक्षय वाडकर ३३ धावांवर नाबाद राहिला. विदर्भाचा पुढील सामना एक डिसेंबर रोजी छत्तीसगडविरुद्गध होईल. त्यानंतर विदर्भाला हैदराबाद व सेनादलाविरुदध खेळायचे आहे.

संक्षिप्त धावफलक :

झारखंड ३३.१ षटकांत सर्वबाद १०७ (अनुकूल रॉय २५, यश ठाकूर ३-२७, दर्शन नळकांडे २-१६, अक्षय कर्णेवार २-१६), पराभूत विदर्भ १३.४ षटकांत बिनबाद ११० (अथर्व तायडे नाबाद ७०, अक्षय वाडकर नाबाद ३३).

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinchpokli Chintamani : ‘आगमनाधीश’… चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृती

'RSS म्हणजे भारतीय तालिबान, त्यांच्याकडून देशात शांतता बिघडवण्याचं काम..'; मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस नेत्याची सडकून टीका

Bachchu Kadu : निवडणूक आयोग तुमचा मित्र झाला म्हणून तुम्हाला मस्ती आली; बच्चू कडू यांचा सरकारवर हल्लाबोल

अभिनयानेच दिलं जगण्याचं बळ ! पडत्या काळात एकटीने तारला संसार , ज्योती चांदेकर यांची प्रेरणादायी कारकीर्द

Ratnagiri Monsoon Travel: विकेंड ट्रिपसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधताय? मग पावसात खुललेलं नंदनवन रत्नागिरीला नक्की भेट द्या!

SCROLL FOR NEXT