Vijay Hazare Trophy Maharashtra Karnataka esakal
क्रीडा

सीमावाद क्रिकेटमध्ये पोहचणार, महाराष्ट्र - कर्नाटक अहमदाबादमध्ये भिडणार?

अनिरुद्ध संकपाळ

Vijay Hazare Trophy Maharashtra Karnataka : विजय हजारे ट्रॉफीमध्ये क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील महाराष्ट्राच्या संघाने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत सेमी फायनल गाठली आहे. महाराष्ट्राबरोबरच, कर्नाटक आसाम आणि सौराष्ट्रने देखील सेमी फायनल गाठली आहे. सध्या राजकीय पटलावर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवीर ही दोन्ही शेजारी असलेली राज्य क्रिकेटच्या मैदानावर देखील एकमेकांसमोर उभी ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी 330 धावांचे आव्हान ठेवले होते. ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद द्विशतकी खेळी करत यात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर राजवर्धन हंगरगेकरच्या भेदक माऱ्यासमोर उत्तरप्रदेशचा संपूर्ण संघ 272 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. राजवर्धन हंगरगेकरने उत्तर प्रदेशचा निम्मा संघ गारद केला. महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीत सेमी फायनल गाठली. महाराष्ट्राबरोबरच आसाम, कर्नाटक, सौराष्ट्र यांनी देखील सेमी फायनल गाठली आहे.

गुजरातमध्ये 30 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि आसाम याच्यात सेमी फायनल होणार आहे. तर गुजरातमध्येच कर्नाटक सौराष्ट्रविरूद्ध भिडणार आहे. या दोन सामन्यातील विजेते संघ 2 डिसेंबरला अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विजेतेपदासाठी एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकणार आहेत. जर महाराष्ट्र - कर्नाटक अंतिम सामना व्हायचा असेल तर महाराष्ट्राला आसामचा आणि कर्नाटकला सौराष्ट्रचा पराभव करावा लागेल. तरच आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक ड्रीम फायनल पाहयला मिळण्याची शक्यता आहे.

जर विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र कर्नाटक अंतिम सामना झाला तर या सामन्याला सध्याच्या धगधगत्या सीमावादाची किनार नक्कीच असणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत तालुक्यावर दावा सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT