Vijay Hazare Trophy Tamil Nadu sakal
क्रीडा

Vijay Hazare Trophy : मुंबईचा खेळ खल्लास! तमिळनाडूची थाटात उपांत्य फेरीत एन्ट्री

Kiran Mahanavar

Vijay Hazare Trophy : भारतातील स्थानिक क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाचे विजय हजारे एकदिवसीय करंडकातील आव्हान सोमवारी संपुष्टात आले. तमिळनाडू संघाने मुंबई संघावर ७ विकेट व ४० चेंडू राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंबईकडून तमिळनाडू संघासमोर २२८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तमिळनाडू संघाने अवघे तीन विकेट गमावत हे लक्ष्य ओलांडले. बाबा अपराजित (४५ धावा) व नारायण जगदीशन (२७ धावा) या सलामी जोडीने ५० धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात करून दिली. या दोघांसह निशीश राजगोपाल (१ धाव) हा फलंदाज बाद झाल्यानंतर तमिळनाडूची अवस्था ३ बाद १०३ धावा अशी झाली होती, पण बाबा इंद्रजीत (नाबाद १०३ धावा) व विजय शंकर (नाबाद ५१ धावा) या जोडीने नाबाद १२६ धावांची भागीदारी करताना तमिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

याआधी जय बिस्ता (३७ धावा), दिव्यांश सक्सेना (०), हार्दिक तामोरे (२४ धावा), अजिंक्य रहाणे (१ धाव), शम्स मुलानी (२७ धावा) या मुंबईकरांना अपयशाला सामोरे जावे लागले. अजिंक्यला या स्पर्धेमध्ये सूर गवसला नाही. प्रसाद पवारने ५९ धावांची; तर शिवम दुबेने ४५ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला २२७ धावांपर्यंत मजल मारता आली.

विजय हजारे करंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढती निश्‍चित झाल्या आहेत. हरियाना-तमिळनाडू व राजस्थान-कर्नाटक यांच्यात या लढती होतील. १३ व १४ डिसेंबरला हे सामने होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT