Virat Kohli sakal
क्रीडा

Virat Kohli : विराटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय

पर्थमध्ये विराट कोहलीने फक्त 11 धावा करत केला मोठा विक्रम

Kiran Mahanavar

Virat Kohli t20 World Cup Record : विराट कोहलीने 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारताला दोन्ही सामने जिंकून देण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे. जवळपास अडीच वर्षे धावांसाठी झगडणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. कोहलीने टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठा विक्रम केला आहे.

पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने 11 धावा पूर्ण करताच, टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी 1000 धावा करणारा फलंदाज बनला. त्याच्या सध्या 1001 धावा आहेत. विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा हा भारताचा एकमेव फलंदाज आहे जो 1000 धावांच्या जवळ आहे. रोहितने 33 डावात 919 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात खेळला जात असलेला सध्याचा विश्वचषक आतापर्यंत कोहलीसाठी चांगलाच राहिला आहे. कोहलीने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो फार काळ टिकला नाही आणि अवघ्या 11 धावा करून बाद झाला.

श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने 1016 धावांसह टी-20 विश्वचषकात पहिल्या क्रमांकावर आहे. जयवर्धनेने ही धावा 39.07 च्या सरासरीने केली आहे. ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. विराट जयवर्धनेपेक्षा 15 धावांनी मागे आहे आणि टी-20 विश्वचषकात विराट ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहता विराट दक्षिण टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT