Virat Kohli  sakal
क्रीडा

Virat Kohli : 3 वर्षांपासून शतकासाठी टीका सहन करणाऱ्या कोहलीचा मोठा खुलासा

विराट कोहलीने अखेर त्याचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले या खास क्षणानंतर कोहलीने मोठे केले वक्तव्य

Kiran Mahanavar

virat kohli after 71st century : क्रिकेट चाहते ज्याची तब्बल 3 वर्षे वाट पाहत होते ते विराट कोहलीचे 71 वे शतक आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध आले. या शतकानंतर विराट कोहलीनेही मोठं वक्तव्य केलं आहे.अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या सामन्यात 122 धावा केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने सांगितले की, या फॉरमॅटमध्ये मला त्याची अपेक्षा नव्हती. याचबरोबर त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शकतांच्या यादीत रिकी पाँटिंगशी बरोबरी केली. आता शतकांच्या यादीत विराट कोहलीपुढे फक्त शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर उरला आहे.

कोहली म्हणाला, गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवल. मी एका महिन्याने 34 वर्षांचा होईल. आनंद रागाने साजरा करणे ही भूतकाळातील गोष्ट आहे. मला खरोखरच आश्चर्य वाटलं. मी कधीच या फॉरमॅटमध्ये शतकाचा विचार केला नव्हता. अनेक गोष्टींचा हा परिणाम आहे. संघाने खूप मदत केली. कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला त्याच्या कठीण काळात खडकाप्रमाणे उभे राहण्याचे श्रेय दिले. तो म्हणाला, यावेळी फक्त एकच विशेष व्यक्ती आहे जी कठिण काळात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. तिने सर्व काही पाहिले ती म्हणजे अनुष्का. हे शतक त्याच्यासाठी आणि आमची मुलगी वामिकासाठी आहे.

जवळपास 1121 दिवसांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. आशिया कपमधील भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरूद्ध त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. त्याने आपले 71 वे शतक पूर्ण करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील पहिलेच शतक आहे. त्याला ही टी 20 शतकी खेळी करण्यास सामन्यांचे शतक पार करावे लागले. मात्र 'देर आये दुरुस्त आये' प्रमाणे या शतकाने अनेक विक्रम केलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT