Virat Kohli Aggression esakal
क्रीडा

Virat Kohli Aggression : ...हे मला चाहता म्हणून आवडणार नाही; विराटची आक्रमक फलंदाजी माजी खेळाडूला रूचली नाही

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Aggression : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात विराट कोहली तब्बल 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळण्यासाठी मैदनात उतरला. रोहित शर्मा पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता माघारी फिरल्यानंतर विराटने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत त्याची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विराटचा हा प्रयत्न भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राच्या पचनी पडला नाही.

विराट कोहलीने 14 महिन्यानंतर टी 20 मध्ये पुनरागमन केलं. पहिल्याच सामन्यात त्याने 16 चेंडूत 29 धावांची आक्रमक खेळी करत सलामीवीर यशस्वी जयस्वाल सोबत भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्याने 180 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. मात्र विराटने अशा स्टाईलने फलंदाजी करणे आकाश चोप्राला (Aakash Chopra) रूचले नाही.

आकाश चोप्रा आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'मला असं वाटतं की विराट कोहली त्याचं सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. त्याने 140 च्या सरासरीने टी 20 क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जर त्याने अशाच पद्धतीचा खेळ केला तर ते फार चांगलं आहे.'

'जर त्याने यापेक्षा काही जास्त करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचे सातत्य गमावून बसेल. जर त्याने त्याचे सातत्य गमावले तर एक इंडियन क्रिकेट फॅन या नात्यानं मला थोडं दुःख होईल.'

विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये 116 सामन्यात 4037 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 138.20 चे स्ट्राईक रेट आणि 52.42 ची सरासरी राखत ठोकल्या आहेत. विराट कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये आपला फॉर्म कायम ठेवला आहे.

आकाश चोप्राने रोहित शर्माच्या शॉट सिलेक्शनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तो म्हणाला की, 'पहिल्या सामन्यात धावबाद होणं त्याची चूक नव्हती. मात्र दुसऱ्या सामन्यातील शॉट सिलेक्शन मात्र त्याची चूक होती. रोहित शर्माच्या क्षमतेविषय कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र त्याला आयपीएलमध्ये आपला फॉर्म दाखवावा लागेल. जर तो अशाच प्रकारची फलंदाजी करत असेल तर आपल्याला त्याच्याकडून 38 - 40 धावांची गरज असेल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

SCROLL FOR NEXT