virat kohli and rohit sharma celebrated victory 
क्रीडा

Video : हे दृश्य पाहून वाटले वर्ल्ड कप आपलाच; दोस्ती! भावा तू खूश तर आपण खूश

आजी-माजी कॅप्टनचं नातं कसं, जसं रोहित अन् विराटचं तसं

Kiran Mahanavar

Virat Kohli-Rohit Sharma Celebrated Victory Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. पहिला टी-20 ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला. तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 1 चेंडू बाकी असताना ही धावसंख्या गाठली. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली एकत्र विजय साजरा करताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्याने 19 व्या षटकातील 5 व्या यॉर्कर चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. यादरम्यान रोहितने विराट कोहलीलाही मिठी मारली. हे दृश्य पाहून वाटले वर्ल्ड कप आपलाच आहे. शेवटच्या षटकात सिक्स मारून कोहली बाद झाला. त्यामुळे तो पॅड न काढता कर्णधारासोबत बसला होता.

कोहलीने या निर्णायक सामन्यात चेस मास्टच्या रूपात 63 धावांची शानदार खेळी खेळली. पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा रोहित शर्माने पाठीवर थाप देऊन त्याचे पॅव्हेलियनमध्ये स्वागत केले. किंग कोहलीचे टी-20 क्रिकेटमधील हे 33 वे अर्धशतक आहे. कोहलीने या फॉरमॅटमध्ये 3660 धावा केल्या असून तो कर्णधार रोहित शर्मापेक्षा फक्त 34 धावांनी मागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT