Virat Kohli Angry over DRS Field Umpire Erasmus Reaction  esakal
क्रीडा

DRS वर विराट भडकला, फिल्ड अंपायरची धक्कादायक रिअ‍ॅक्शन

अनिरुद्ध संकपाळ

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील निर्णायक कसोटी सामन्यात DRS निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. डीन एल्गरने घेतलेल्या रिव्ह्यू (Dean Elgar DRS) वरुन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच तापला. या DRS निर्णयानंतर फिल्ड अंपायर मराईस इरासमुस (Marais Erasmus) यांची रिअ‍ॅक्शन देखील धक्कादायक होती. विराट कोहलीने स्टम्प माईकजवळ (Stump Mic) जात DRS च्या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याचबरोबर त्याने ब्रॉडकास्टरनाही बॉल शाईन करताना सारखा कॅमेरा भारतीय खेळाडूंवरच का ठेवता. दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही कॅमेरा ठेवत जा असे सुनावले. (Virat Kohli Angry over Dean Elgar DRS Field Umpire Marais Erasmus Reaction)

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (RSA vs IND 3rd Test) भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने एक बाजू लावून धरली होती. कीगन पिटरसन (keegan Petersen) आणि डीन एल्गर भागीदारी रचण्याच्या प्रयत्नात होते. आफ्रिका शंभरी गाठायला आला होता तरी भारताला फक्त मार्करमचीच विकेट घेण्यात यश आले होते. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी अनुभवी आर. अश्विनच्या हातात चेंडू दिला. अश्विननेही कर्णधाराची निराशा न करता डीन एल्गरला अडचणीत पकडणारी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

अडखळत खेळणाऱ्या डीन एल्गरने अश्विनचा (R. Ashwin) एक आत येणार चेंडू ओळखण्यात चूक केली. तो चेंडू थेट एल्गरच्या पॅडवर जाऊन आदळला आणि भारतीय खेळाडूंनी जोरदार अपिल केले. अंपायर इरासमुस यांनीही ही अपिल उचलून धरत डीन एल्गरला बाद ठरवले. मात्र एल्गरने DRS घेतला. थर्ड अंपायने रिव्ह्यूमध्ये चेंडूचा टप्पा आणि उंची तपासली DRS ने टप्पा बरोबर दाखवला मात्र उंचीच्या बाबतीत गोंधळ निर्माण होणारा निर्णय दिला. चेंडू एल्गरच्या अगदी पुढ्यात पडून उसळी घेत होता. मात्र DRS मध्ये चेंडू स्टंपच्या वरुन जात असल्याचे दर्शवले आणि फिल्ड अंपायर इरासमुस यांचा निर्णय बदलत एल्गरला नाबाद ठरवले.

या निर्णयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) डोक्यालाच हात लावला. तर फिल्ड अंपायर इरासमुस यांनी 'हे अशक्य आहे' अशी धक्कादायक प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया स्टंप माईकने (Stump Mic) पकडली. इरासमुस हे योग्य निर्णय देण्याबाबत ओळखले जातात. त्यांची अ‍ॅक्युरसी इतर अंपायर्स पेक्षा अत्यंत चांगली आहे. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आल्याने याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naxalites Support Rahul Gandhi : राहुल गांधींच्या 'वोटचोरी'च्या आरोपांना नक्षलवाद्यांचाही पाठिंबा...११ पानी पत्रक जारी करत दिलं समर्थन!

Maharashtra Govt Jobs : भूमिअभिलेख विभागात ९०५ पदांची भरती, राज्य सरकारची मान्यता

Sunday Morning Breakfast : रविवारी ब्रेकफास्टला बनवा कुरकुरीत बीटचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

SCROLL FOR NEXT