Virat Kohli Anushka Anushka Sharma On Holiday  esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट कोहली अनुष्कासोबत व्हेकेशनवर, संघाची घोषणा होताच गाठले मुंबई विमानतळ

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Anushka Anushka Sharma On Holiday : श्रीलंकेविरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतेच संघाची घोषणा केली. विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना टी 20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान, विराट कोहलीने टी 20 मालिकेतून ब्रेक मागितला होता अशी बातमी आली होती. आता हा ब्रेक मोठा आहे की फक्त श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपुरता आहे हे येणारा काळच ठरवले.

काल (दि. 27) रात्री उशिरा संघाची घोषणा झाली अन् आज सकळी विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. हे दोघेही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हॉलिडेवर जात आहेत. विराट कोहली श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे हा हॉलीडे वनडे मालिकेपूर्वी संपणार आहे.

विराट कोहली बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यानंतर तो मुंबईमधील आपल्या घरी परतला. आता अनुष्का आणि विराट व्हेकेशनसाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. बुधवारी त्यांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आले.

विराटप्रमाणे भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील वनडे मालिकेपूर्वी व्हेकेशनवर गेला आहे. रोहित शर्मा आपल्या मुलीचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करणार आहे. रोहित शर्मा आधीच मालदीवमध्ये पोहचला आहे. रोहितच्या मुलीचा वाढदिवस 30 डिसेंबरला असतो. रोहित शर्मा पत्नी रितिकासोबत मंगळवारीच मुंबईहून मालदीवसाठी रवाना झाला होता. (Latest Sports News)

श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT