Virat Kohli Vamika  esakal
क्रीडा

विराट कोहलीने केले 'परफेक्ट डॅड' वाले काम

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आज ( दि. 16 ) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाली. या दौऱ्यावर भारतीय संघासोबत त्यांचे कुटुंबीय देखील सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे (Team India) खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय सर्वजण एकाच गाडीतून विमानतळावर दाखल झाले.

टीम इंडिया ज्यावेळी विमानतळावर दाखल झाली. त्यावेळी संघाच्या बसमधून कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका (Vamika) देखील बाहेर आले. बाहेर माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे तयारच होते. याच दरम्यान, विराट कोहलीने माध्यम प्रतिनिधींना वामिकाचे फोटो न काढण्याची विनंती केली. विराटचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) भारतीय संघ तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद (Virat Kohli Press Conference) घेतली होती. या पत्रकार परिषद त्याने आपण एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचा खुलासा देखील केला होता. याच पत्रकार परिषदेत त्याने टी 20 कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयबरोबर काय बोलणे झाले यावरही भाष्य केले. सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांनी या संदर्भात केलेल्या आधीच्या वक्तव्य आणि विराटचा ताजा खुलासा हे परस्पर विरोधी आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT