Virat Kohli behaver Change in Front Of Wife Anushka Sharma  esakal
क्रीडा

विराट बायकोसमोर 'शंभर नंबरी, शुद्ध सज्जन'; पाठ फिरली की.....

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहलीचा दिल्ली बॉय ते भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व होतानाचा प्रवास आपण सर्वांनी पाहिला आहे. विराट कोहलीने भारतीय तरूण पुढीसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्याचा फिटनेस वर्ल्ड क्लास आहे. त्याचे विजयाप्रती आक्रमक असणे अनेकांना भावते. कधी कधी त्याच्या आक्रमकपणावर देखील टीका होत असते. मात्र विराट कोहलीने जेव्हापासून अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे तेव्हापासून त्याच्या व्यक्तीमत्वात बराच बदल झाला आहे. ही गोष्ट खुद्द विराट कोहली देखील मान्य करतो.

दरम्यान, विराट कोहलीचा जुना मित्र प्रदीप सांगवान याने विराट कोहलीबाबतचा एक वेगळा अँगल सर्वांसमोर ठेवला. विराट कोहली प्रसिद्ध होण्यापूर्वी खेळाडूंची खेचण्यात, दंगा मस्ती करण्यात अग्रेसह होता. कालांतराने विराटची केसं आणि दाढी पांढरी होत असली तरी त्याचा हा खट्याळपणा गेलेला नाही. याबाबतच प्रदीप सांगवानने सांगितले की, विराटला तो लहान असल्यापासून ओळखतो. मात्र एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाल्यावर विराटचे वागणे पाहून प्रदीप सांगवानला आश्चर्याचा धक्का बसला. प्रदीप सांगवानने त्यावेळी केलेले निरिक्षण त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. तो म्हणाला की विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत असताना एकदम सज्जन असल्यासारखे वागतो. मात्र तिची पाठ फिरली की, जुन्या खट्याळ, दंगेखोर विराटचे दर्शन घडते. ज्यावेळी अनुष्का पुन्हा येते तेव्हा लगेच विराट सज्जन होतो.

प्रदीप याबाबत म्हणाला की, 'मी विराटला एका कार्यक्रमादरम्यान भेटलो होतो. मला वाटले की विराटमध्ये बदल झाला असेल. मात्र अनुष्काची पाठ फिरल्या फिरल्या विराट प्रँक करण्यास सुरुवात करतो. जेव्हा अनुष्का परत येते तो पुन्हा एक सज्जन गृहस्थ होतो. पुन्हा पत्नी दुसरीकडे गेली की विराटचे दिल्ली स्टाईल बोलणे सुरू होते.'

यशस्वी होणे सोपे नसते त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. कोहलीने ते कष्ट घेतले. त्याला आता त्याचा फायदा होत आहे. मात्र त्यापेक्षाही कठिण काही असते ते हे यश पचवणे. यशाची हवा तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नये याची काळजी घ्यावी लागते. विराट कोहलीने हीच गोष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने साधली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT