Virat Kohli sakal
क्रीडा

Virat Kohli : वडिलांच्या मृत्यूनंतर विराटने भावाला दिले होते वचन...

संपूर्ण कुटुंब रडत होते आणि मी...

Kiran Mahanavar

Virat Kohli Birthday : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. किंग कोहली आज 34 वर्षांचा झाला आहे. विराट कोहलीच्या वाढदिवशी त्याच्या संबंधित एक गोष्ट शेअर करणार आहोत, जी फार कमी लोकांना माहिती आहे. विराटने लहान वयातच वडील गमावले होते. विराट कोहलीच्या आयुष्यातील हा पैलू खूप वेदनादायी होता, ज्याची फार कमी लोकांना माहिती आहे.

विराटने अमेरिकन क्रीडा पत्रकार ग्रॅहम बेन्सिंगर यांच्याशी खास संवाद साधताना सांगितले होते की, माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी रणजी ट्रॉफी सामना खेळत होतो. मला दुसऱ्या दिवशी संघासाठी फलंदाजी करायची होती. पण वडिलांची प्रकृती फारच वाईट झाली होती. आम्ही जवळच्या डॉक्टरांकडे गेलो, पण रात्री इतका उशीर झाला होता की कोणीही दरवाजा उघडला नाही. मग आम्ही त्यानां दवाखान्यात नेत असताना पहाटे 2.30 वाजता त्याचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या निधनानंतर घरातील सर्व रडू लागले पण माझ्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते.

विराट कोहलीच्या वडिलांचे 19 डिसेंबर 2006 रोजी निधन झाले. विराटच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांचे वय अवघे 54 वर्षे होते. त्यावेळी विराट फक्त 18 वर्षांचा होता. कोहली इतका खंबीर होता की, सकाळी कोचला फोन केला आणि सगळं सांगितलं आणि दिल्ली आणि कर्नाटक यांच्या सामन्यानंतरच तो वडिलांच्या अंत्यसंस्काराला गेला.

विराटने सांगितले की, मी सामना खेळुन आलो आणि अंतिम संस्कार केले. त्यानंतर मी माझ्या भावाला वचन दिले की मी टीम इंडियासाठी खेळणार. मी भारतासाठी खेळावे अशी पापांची नेहमीच इच्छा होती. यानंतर सर्वकाही आयुष्यात दुसरे आले तरी क्रिकेट ही माझ्यासाठी पहिली प्राथमिकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT