Virat Kohli Sakal
क्रीडा

विराटचा फोन स्विच ऑफ; कोचकडून BCCI च्या कारभारावर ताशेरे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडेची जबाबदारी रोहितच्या खांदयावर देण्यात आली आहे.

सुशांत जाधव

'जोर का धक्का धीरे...से' स्टाइलमध्ये BCCI ने विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन बाजूला केले. कोहलीची जागा आता रोहित शर्माने (Rohit Sharma) घेतली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहितला कसोटीच्या उप-कर्णधारपदासह एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धूरा देण्यात आली आहे. कोहलीने वर्कलोडचे कारण सांगत टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोडली. त्यानंतर त्याच्याकडे वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व कायम राहिल, असे बोलले गेले. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडेची जबाबदारी रोहितच्या खांदयावर देण्यात आली.

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याप्रकरणावर भाष्य करताना ही वेळ विराटमुळेच ओढवल्याचे म्हटले होते. कोहलीनं टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण कोहली आपल्या निर्णयावर ठाम होता. टी-20 आणि वनडेत वेगवेगळे कर्णधार हे समीकरण सोडवण्यासाठी रोहित शर्माच्या नावाचा विचार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले होते.

टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात झालेली खांदेपालट जितकी क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे तितकीच विराट कोहलीच्या लहानपणीच्या कोचलाही बुचकळ्यात पाडणारी आहे. कोहलीचे कोच राजकुमार शर्मा यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर आपले मत मांडले आहे. याशिवाय कॅप्टन्सीमध्ये झालेल्या बदलानंतर कोहलीशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिलीये.

कोहलीचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असेही ते म्हणाले. ज्यावेळी विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले त्यावेळीच निवड समितीने त्याला वनडेचे नेतृत्व सोडायला सांगायला पाहिजे होते. पण असे झाले नाही. यावरुन बीसीसीआयचा कारभार पारदर्शक नाही, हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT