Virat Kohli Dedication  esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट भावा मानलं! खेळाप्रती समर्पण असावं तर विराट सारखं, Photo होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Dedication : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था 3 बाद 48 धावा अशी झाली होती. दोन्ही सलामीवीरांनी 41 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने भारताच्या तगड्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्याने भारताची सर्वात महत्वाची विकेट घेतली. तैजुलने विराट कोहलीला अवघ्या 1 धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

विराट कोहली पहिल्याच कसोटीत अवघ्या 1 धावेवर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यात विराटचे शतक अवघ्या 99 धावांनी हुकले अशा पोस्टचा समावेश होता. मात्र यात सर्वांमध्ये एका फोटोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोत दिसते की विराट कोहली बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये न बसता नेटमध्ये फलंदाजीचा सराव करण्यात गेला होता. सराव करताना देखील विराटने डावखुऱ्या फिरकी गोलंदाला खेळण्याचा सराव केला. चहापानावेळी विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो स्पोर्ट्स यारीने पोस्ट केला आहे.

दरम्यान, विराट कोहली बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने 45 चेंडूत धडाकेबाज 46 धावा करत भारताला शतकी मजल मारून दिली. पंत बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी रचत भारताला 261 धावांपर्यंत पोहचवले. मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या चेतेश्वर पुजाराला तैजुलने 90 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT