Virat Kohli becomes fastest batsman to score 5000 ODI runs at home soil
Virat Kohli becomes fastest batsman to score 5000 ODI runs at home soil esakal
क्रीडा

पहिल्या वनडेत विराटचा फ्लॉप शो तरी '5 हजारी मनसबदारी'

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिला वनडे सामना भारताचने 6 विकेट राखून जिंकला. पहिल्या सामन्यात भारताकडून (India Cricket Team) गोलंदाजीत युझवेंद्र चहलने चांगली कामगिरी केली. तर कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळत भारताच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मात्र फ्लॉप ठरला. त्याला फक्त 8 धावाच करता आल्या. मात्र या 8 धावांच्या जोरावर त्याने 5 हजारी मनसबदारी मिळवली आहे. (Virat Kohli becomes fastest batsman to score 5000 ODI runs at home soil)

विराट कोहलीचा फ्लॉप शो वेस्ट इंडीज (West Indies Cricket Team) विरूद्धच्या पहिल्या वनडे (ODI Cricket) सामन्यातीही दिसून आला. त्याला 4 चेंडूत फक्त 8 धावाच करता आल्या. मात्र या 8 धावांच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. मायदेशात 5000 वनडे धावा करण्याचा विक्रम हा फक्त सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. त्याने 48.11 च्या सरासरीने भारतात 6976 धावा केल्या आहेत. आता या यादीत विराट कोहली देखील सामिल झाला आहे.

विराट कोहलीने फक्त 8 धावा करत मायदेशात 5000 धावा करण्याचा विक्रम केला नाही तर तो मायदेशात सर्वात वेगवान 5000 धावा पूर्ण करणारा खेळाडू देखील ठरला आहे. त्याने फक्त 96 सामन्यात हा भीम पराक्रम केला आहे. याचबरोबर विराट कोहली घरच्या मैदानावर 5000 वनडे धावा करणारा तो जागतिक क्रिकेटमधील चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि जॅक कॅलिस यांनी हा पराक्रम केला होता.

  • सचिन तेंडुलकर - 6976 (सरासरी 48.11)

  • रिकी पाँटिंग - 5521 (सरासरी 39.71)

  • जैक कॅलिस - 5186 (सरासरी 45.89)

  • विराट कोहली - 5002* (सरासरी 60.25)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT