Virat Kohli gives Tips to India U19 Team esakal
क्रीडा

U19 World Cup: युवा संघाला माजी कर्णधाराकडून 'विराट' टिप्स

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप (Under 19 World Cup 2022) स्पर्धेत भारताच्या 19 वर्षाखालील संघाने (Under 19 India Team) ऑस्ट्रेलियाला (Australia) नमवत फायनल गाठली. भारताने 19 वर्षाखालील वर्ल्डकपची विक्रमी आठव्यांदा फायनल गाठली आहे. उद्या (दि. ५) त्यांचा मुकाबला इंग्लंडबरोबर (Under 19 England Team) होणार आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघातील युवा खेळाडूंशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. विराट कोहलीच्या नेतृत्वात 2008 ला भारताने 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता. (Virat Kohli gives Tips to India U19 Team)

भारताच्या 19 वर्षाखालील संघातील कौशल तांबे (Kaushal Tambe) आणि राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) यांच्याशी विराट कोहलीने व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. हा संवाद या युवा खेळाडूंनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर देखील केला आहे. हंगरगेकरने (Rajvardhan Hangargekar) आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'विराट भाई बरोबर संवाद साधणे जबरदस्त होते. तुमच्याकडून आयुष्याबाबत आणि क्रिकेटबाबत काही महत्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या. यामुळे आम्हाला येत्या काळात सुधारणा करण्यास मदत होणार आहे.' तर कौशल तांबेने विराट कोहलीला सर्वकालीन महान खेळाडू (GOAT) म्हणून संबोधले. तो इन्स्टाग्रामवर लिहितो की, 'अंतिम सामन्यापूर्वी सर्वकालीन महान खेळाडूकडून महत्वाचा सल्ला.'

भारताचा इंग्लंड बरोबरचा अंतिम (India U19 vs England U19) सामना अँटिग्वामधील विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर उद्या म्हणजे ५ फेब्रुवारीला सांयकाळी 6.30 मिनिटांनी सुरू होईल. भारताने यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखाली सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव केला होता. भारताला विक्रमी पाचव्यांदा 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT