Virat Kohli News esakal
क्रीडा

Virat Kohli: IAS अधिकारी म्हणतो, कोहलीनं ५ गोष्टी शिकवल्या!

त्या सनदी अधिकाऱ्यानं आपण जेव्हा भारत पाकिस्तान हा सामना पाहिला तेव्हा त्यातील विराटच्या फलंदाजीनं प्रभावित झाल्याचे सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Viral News: भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय संघाच्या विराट कोहलीनं केलेल्या फलंदाजीनं साऱ्या देशाला भुरळ घातली आहे. त्याच्या फलंदाजीचं गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे कौतूक होताना दिसत आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी कोहलीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. अशातच एका सनदी अधिकाऱ्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

त्या सनदी अधिकाऱ्यानं आपण जेव्हा भारत पाकिस्तान हा सामना पाहिला तेव्हा त्यातील विराटच्या फलंदाजीनं प्रभावित झाल्याचे सांगितले. त्याचं करावं तेवढं कौतूक कमीच आहे. विराटनं आपल्याला खूप आनंद दिला. त्यानं केलेल्या खेळीच्या जोरावर भारताला पाकिस्तानला पराभूत करता आलं हे लक्षात घ्यायला हवे. दरम्यान कोहलीवर देशभरातून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाल दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे.

सोशल मीडियावर तर कोहलीनं नुसता धुमाकुळ घातला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला शिकवलेल्या धड्यानं कोहलीची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे. अशातच त्या आयएएस अधिकाऱ्यानं कोहलीच्या खेळातूनल आपण पाच गोष्टी शिकल्याचे सांगत लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणतात, कोहलीनं आपल्याला काही गोष्टींची नव्यानं जाणीव करुन दिली आहे. त्याचे पालन आपण दैनंदिन आयुष्यात केले तर त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

पहिली गोष्ट म्हणजे, तुमच्यावर आलेली वाईट वेळ ही काही कायमस्वरुपी नाही. ती जाणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की, तुम्ही तुमच्यातील संघर्षानं आणि कष्टानं साऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकता. ते तुमच्यावर अवलंबून आहे. तिसरी गोष्ट तो आपल्याला सांगून गेला की, शेवटपर्यत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. तसं झाल्यास विजय आपला आहे. चौथी गोष्ट म्हणजे, लोकांची स्मरणशक्ती फार कमी असते हेही कायम लक्षात ठेवायला हवे. आणि पाचवी गोष्ट अशी की, जेव्हा आपल्यात आत्मविश्वास येतो तेव्हा कठीण परिस्थितीचा ताण जाणवत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT