virat kohli hotel room video leaked and hotel crown perth apologies remove person who made video 
क्रीडा

Virat Kohli Leaked Video: कोहलीच्या रूम मधला व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला; हॉटेलने केली 'ही' कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच एका व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ त्याच्या पर्थमधील हॉटेल रूमचा आहे. त्यावेळी हॉटेलमधील कोहलीच्या खोलीत एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि कोहली खोलीत नसतानाचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता हॉटेलने याबाबत आपले वक्तव्य जारी केले असून माफी मागितली आहे.

या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना हॉटेलने सांगितले आहे की त्यांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली असून यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला हॉटेलमध्यून काढून टाकण्यात आले आहे. क्राउन पर्थ नावाच्या हॉटेलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही या प्रकरणात सहभागी असलेल्या आमच्या पाहुण्यांची माफी मागतो. या प्रकरणात क्राऊनने तातडीने पावले उचलली आहेत. यामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग होता त्याला काढून टाकण्यात आले असून त्याला काऊंटच्या अकाउंटमधूनही काढून टाकण्यात आले आहे. मूळ व्हिडिओ सोशल मीडियावरूनही हटवला जाईल.

हॉटेलने सांगितले की ते या प्रकरणाची थर्ड पार्टीकडून चौकशी केली जात आहे . निवेदनात असे लिहिले आहे की, क्राऊन या प्रकरणाची तृतीय पक्षामार्फत चौकशी करत आहे. त्याचबरोबर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि आयसीसीची माफी मागतो.

विराटने इन्स्टाग्रामवर राग काढला

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपला राग व्यक्त केला होते. कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मला वाटते की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित होतात, त्यांना भेटतात आणि मी त्याचे कौतुक करतो. पण या व्हिडिओने माझ्या प्रायव्हसी बद्दल चिंता वाढवली आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या खोलीत प्रायव्हसी मिळत नसेल, तर मी माझ्या पर्सनल स्पेसची अपेक्षा कुठे करावी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT