virat
esakal
Virat Kohli’s Instagram Account Becomes Active Again : भारतीय क्रिकेटसंघाची ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा आणि लाखो चाहते असणाऱ्या विराट कोहलीचं त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पुनरागमन झालं आहे. त्याचं इन्स्टा अकाउंट पुन्हा पूर्ववत झाल्याचं आता दिसत आहे. यामुळे त्याच्या लाखो फॉलोअर्सना हायसे वाटत आहे.
कारण, काल मध्यरात्रीनंतर त्याचे इन्स्टा अकाउंट अचानक गायब झाले होते. यामुळे त्याच्या लाखो फॉलोअर्सना मोठा धक्का बसला होता. शिवाय, असे का झाले याचे कारणही समोर आले नव्हते, त्यामुळे अधिकच चर्चांना उधाण आले होते.
विराटने स्वत:हून ते डिलीट केले? की ते डिअक्टिव्ह झाले? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चिले जात होते. विशेष म्हणजे याबाबत विराट कोहली, अनुष्का शर्मा किंवा विराटची मॅनेजमेंट टीम आणि इन्स्टाकडूनही काहीच माहिती समोर आलेली नव्हती.
अखेर त्याचे इन्स्टा अकाउंट जवळपास सहा ते सात तासानंतर पुन्हा अक्टिव्ह झाल्याचे दिसल्याने, त्याच्या लाखो फॉलोअर्सना हायसे वाटत आहे. कारण, इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत जगातील कोणताही क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा या स्टार खेळाडूला मागे टाकू शकत नाही. किंग कोहलीचे तब्बल २७४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि तो स्वत: २८३ अकाउंट फॉलो करतो.
आता त्याचे इंस्टाग्राम अकाउंट दिसत असल्याने, हे स्पष्ट झाले आहे की विराट कोहलीने स्वतःहून त्याचे अकाउंट डिअक्टिव्ह केले नव्हते. मग ते कदाचित काही तांत्रिक बिघाडामुळे झाले असावे असे आता समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.