Virat Kohli IND vs AUS 2nd Test  esakal
क्रीडा

Virat Kohli IND vs AUS 2nd Test : घरच्या मैदानावर शतकी खेळी येणार; विराटच्या मेहनतीला तोड नाही!

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IND vs AUS 2nd Test : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळानंतर आपल्या घरच्या मैदानावर, दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर कसोटी सामना खेळणार आहे. विराट कोहलीने आपला शतकांचा दुष्काळ संपवत टी 20 आणि वनडेमध्ये शतक झळकावले. मात्र जेव्हापासून विराट बॅडपॅचमधून बाहेर आला आहे त्याने कसोटीत शतकी खेळी केलेली नाही.

विराटच्या बॅटमधून शेवटचे 27 वे कसोटी शतक हे 22 नोव्हेंबर 2019 बांगलादेश विरूद्ध आले होते. आता त्याला दिल्लीच्या घरच्या मैदानावर आपला तब्बल 3 वर्षांचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. तो यासाठी मोठी मेहनत देखील घेत आहे.

विराट कोहलीने बराचवेळ नेटमध्ये फलंदाजी केली. याचबरोबर त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज खेळण्यात थोडी अडचण निर्माण होते. त्यामुळे विराट कोहलीने रफ पॅच असलेल्या खेळपट्टीवर उत्तर प्रदेशचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारला नेट बॉलर म्हणून पाचारण करण्यात आले.

सौरभच्या गोलंदाजीने विराट कोहलीला चांगलेच दमवले. टप्पा घेतल्यानंतर जास्त उसळी न घेणाऱ्या चेंडूवर विराट कोहलीला अडचण निर्माण होत होती. विराट कोहलीने पुलकीत नारंग आणि ऋतिक शौकीन यांच्या गोलंदाजीवर देखील फिरकीचा कसून सराव केला.

विराट कोहलीने फलंदाजीसोबतच आपल्या फिल्डिंगवर देखील भरपूर काम केले. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने स्लीपमध्ये उभा असताना फिरकी गोलंदाजीवर अनेक झेल सोडले होते. विराट कोहली हा टीम इंडियातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे त्याच्याकडून झेल सुटल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दिल्ली कसोटीपूर्वी विराट कोहलीने स्लीप फिल्डिंगचा देखील सराव केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Ashta Bhavai Festival : 1200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा! सांगलीच्या आष्ट्यात आजपासून प्रसिद्ध 'भावई उत्सव'; काय आहे खास? महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचं आहे श्रद्धास्थान

Snake Safety in Monsoon : सापाची पिल्ले दिसायला लहान, पण जन्मापासूनच असतात विषारी; पावसाळ्यात शेतात जाताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी, सर्पदंशानंतर नकोत घरगुती उपाय

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

SCROLL FOR NEXT