Virat Kohli IND vs ENG esakal
क्रीडा

Virat Kohli IND vs ENG : विराट आहे परदेशात... संघात परतण्याबाबत अनिश्चितता, तिसऱ्या कसोटीला देखील मुकणार?

Virat Kohli IND vs ENG : विराट कोहलीसह मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा देखील तिसऱ्या कसोटीला मुकणार?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या (दि. 2) विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. विराट कोहलीने पहिल्या कसोटीच्या दोन दिवस आधीच पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली होती. तो तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात परतेल अशी अशा होती. मात्र याबबत बीसीसीआयकडून अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विराट कोहली तिसऱ्या कसोटीत तरी खेळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेणे हे भारतीय संघासाठी चांगलेच महागात पडले. भारताला पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेताना वैयक्तिक कराण दिलं होतं. मात्र नेमकं विराटने का माघार घेतली हे समजू शकलं नाही.

आता दुसरा कसोटी सामना उद्या सुरू होत असून अजूनही विराटने कोणत्या कारणाने माघार घेतली अन् तो कधी परतणार हे गुलदस्त्यातच आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी कमकूवत झाल्याचं पहिल्या कसोटीत आपण पाहिलं. भारताला 28 धावांनी पराभव सहन करावा लागला.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली हा सध्या भारतात नाहीये. विराटच्या परदेशी जाण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे विराट कोहली संघात कधी परतणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT