Virat Kohli 
क्रीडा

विराट, मयांकच्या अर्धशतकाने भारताच्या 5 बाद 264 धावा

वृत्तसंस्था

जमैका : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर मयांक अगरवाल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. 

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काहीशा हिरव्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर विंडीज कर्णधार होल्डरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; पण भारताच्या राहुल आणि मयांक या सलामीवीरांनी त्यांना सुरवातीला यश मिळू दिले नाही. राहुलची सुरवात आत्मविश्‍वासाने भरलेली होती. पण, होल्डरने आपल्या पहिल्याच षटकांत राहुलला बाद केले. त्याने पहिल्या स्लिपमध्ये कॉर्नवलकडे झेल दिला. त्यानंतर कॉर्नवॉलने गोलंदाजी मिळाल्यावर पुजाराला चकवले. टप्पा पडून उसळी घेतलेल्या त्याच्या एका चेंडूवर पुजारा फसला आणि पॉइंटवर त्याचा झेल ब्रुक्‍सने सहज पकडला. पदार्पणाच्या लढतीत घेतलेला पहिला झेल आणि पहिली विकेट मिळवत कॉर्नवालने आपले पदार्पण साजरे केले. 

अपयशी सुरवातीच्या निराशेत मयांग अगरवालच्या संयमी खेळीचे भारताला समाधान लाभले. त्याला कर्णधार कोहलीने सुरेख साथ केली. पहिल्या कसोटी सामन्यातले अपयश धुवून काढण्यासाठी उत्सुक असलेल्या मयांकने नेटाने फलंदाजी केली. उपाहाराला भारताच्या 2 बाद 72 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मयांकने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. होल्डरच्या उसळत्या चेंडूवर तो स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. कोहलीच्या साथीला आलेल्या रहाणेनही 24 धावांची खेळी करत कर्णधाराला साथ दिली. अखेर 76 धावांवर असताना विराट होल्डरचा शिकार ठरला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हनुमा विहारी (42) आणि रिषभ पंत (27) धावांवर खेळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT