WTC Final Ind vs NZ
WTC Final Ind vs NZ File Photo
क्रीडा

WTC फायनलपूर्वी विराट कोहलीचे मोठं वक्तव्य

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : टेस्टमधील बेस्ट टीम कोणती? यासाठीची लढाई आता काही तासांत सुरु होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वीच्या मेगा फायनलपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले. क्रिकेट जगतातील टेस्टमधील बेस्ट टीम कोणती हे 5 दिवसाचा निकाल ठरवू शकत नाही. ही मॅच आमच्यासाठी इतर सामन्याप्रमाणेच सामान्य असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथहॅम्प्टनच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅमम्पियनशिपची फायन रंगणार आहे. (Virat Kohli On ICC World Test Championship Final He Says Best Test Team In The World Cant Be Decided 5 Days)

यापूर्वी कोहली म्हणाला की, केवळ 1 कसोटी सामन्यातून टस्टमध्ये बेस्ट कोण? हे ठरवता येणार नाही. मागील 4-5 वर्षातील कामगिरीवरुन याचे सत्य काय ते लक्षात येईल. सध्याच्या घडीला आम्ही तयारीला प्राधान्य देत आहोत. आम्ही इंग्लंडमध्ये केवळ एक कसोटी सामना खेळायला आलेलो नाही. या दौऱ्यात आम्हाला 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याची सुरुवात शुक्रवारपासून होईल, असे सांगत विराटने संपूर्ण दौरा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे बोलून दाखवले.

फायनलची लढत ही आमच्यासाठी प्रत्येक सामन्याप्रमाणेच आहे. हा सामना पाहणाऱ्यांसाठी यातून निश्चितच आनंद मिळेल. आम्ही सर्वोच्च कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत. यासाठी काय करायचे हे आम्हाला माहित आहे, असेही विराट कोहली म्हणाला. 2011 चा वर्ल्ड कप जिंकण्याचा क्षण अविस्मरणीय होता. त्यानंतर वेळ थांबलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आम्ही आनंद घेऊन खेळू. हा एक खास सामना असला तरी आम्ही त्याच्याकडे इतर सामन्याप्रमाणेच असेल, असेही विराट कोहली म्हणाला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याकडे कसोटीमधील वर्ल्ड कपचे स्वरुप आले आहे. या लढतीपूर्वी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. ही मालिका 1-0 अशी जिंकून न्यूझीलंडने भारतीय संघाविरुद्ध भिडण्यासाठी तयार असल्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे मायदेशातील इंग्लंड विरुद्धच्या मालिका विजयानंतर भारतीय संघा आत्मविश्वासाने इंग्लड दौऱ्यावर पोहचला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली असली तरी आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीचे नेतृत्व यशस्वी झालेले नाही. 2017 मध्ये भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या मर्यादित षटकांच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनेच भारतीय संघाला आउट केले होते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायल जिंकून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT