Virat Kohli Sakal
क्रीडा

भारताला नेहमी नावं ठेवणाऱ्या क्रिकेटपटूने केलं विराटचं कौतुक

विराज भागवत

कसोटी मालिकेत भारत १-०ने आघाडीवर; उद्यापासून तिसरा सामना

Ind vs Eng Test: भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्सच्या मैदानावर भेदक मारा करत संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी आधी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकवण्यास त्यांनीच भाग पाडले. विराटने इंग्लंडचा दुसरा डाव सुरू होण्याआधी भारतीय खेळाडूंना वॉर्निंग देऊन ठेवली होती. विराटने खेळाडूंच्या टीम हडलमध्ये असताना सांगितले होते की जर तुमच्यापैकी कोणीही मला मैदानावर खेळताना हसताना दिसला तर त्याची गाठ थेट माझ्याशी असेल. विराटच्या याच भाषणामुळे टीम इंडियाला नावं ठेवणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन त्याच्यावर फिदा झाला.

"विराट कोहलीला नेहमी प्रकाशझोतात राहायला आवडतं. सध्या त्याच्याकडून अपेक्षित धावा केल्या जात नाहीत. पण असे असले तरी तो ज्या प्रकारे संघातील वातावरण उत्साहवर्धक ठेवत, ती बाब कौतुकास्पद आहे. त्याने इंग्लंडचा डाव सुरू होण्याआधी केलेलं भाषणदेखील खूपच बोलकं होतं. 'पुढची ६० षटकं इंग्लंडच्या फलंदाजांसाठी खूप कठीण असायला हवीत. इंग्लंडच्या खेळाडूंशी हसणं खिदळणं खपवून घेणार नाही', असे विराटने त्याच्या खेळाडूंना सांगितलं होतं. इंग्लंडसारख्या संघाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळताना अशाच पद्धतीने खेळायला हवं. उच्च प्रतीच्या खेळाडूचं हेच लक्षण असतं. मैदानाबाहेर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळवा, गळाभेट घ्या किंवा काय वाटेल ते करा, पण मैदानात आक्रमक खेळच व्हायला हवा ही विराटची भूमिका शंभर टक्के योग्य होती", अशा शब्दात वॉनने त्याचे कौतुक केले.

Virat Kohli

विराट नक्की काय म्हणाला होता?

विराट कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये विराट कोहली इंग्लंडचा दुसरा डाव सुरू होण्याआधी मैदानात भारतीय खेळाडूंशी बोलत होता. त्या व्हिडीओमध्ये विराटने भारतीय खेळाडूंना ताकीद दिली होती की पुढच्या ६० ओव्हर्सचा खेळ हा इंग्लंडच्या खेळाडूंसाठी अतिशय कठीण आणि कसोटीचा असाच असायला हवा. नरकयातनांचे दु:ख जितके तीव्र असू शकते त्यापद्धतीची गोलंदाजी आपल्या गोलंदाजांनी करायला हवी. जर तुमच्यापैकी कोणीही मला मैदानावर खेळताना हसताना दिसलं तर याद राखा. विराटच्या या वॉर्निंगमुळे भारतीय खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळ केला आणि सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT