नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्यावर भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी टीका देखील केली. मात्र विराट कोहलीच्या समर्थनात देखील अनेक खेळाडू समोर आले आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) देखील विराट कोहलीच्या समर्थनात पोस्ट केली होती. या पोस्टवर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया (Virat Kohli Reacts To Babar Azam Support Tweet) दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट बाबार आझमच्या ट्विटवर प्रतिक्रिया देईल असे वाटत नाही असे खोचक पद्धतीने म्हणाला होता.
बाबर आझमने टी 20 वर्ल्डकप दरम्यानचा त्याचा आणि विराट कोहलीचा फोटो शेअर करून ट्विट केले की, 'हा काळ देखील निघून जाईल, स्टे स्ट्राँग.' पाकिस्तानच्या एका खेळाडूकडून असे ट्विट होणे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. बाबर आझमच्या ट्विटनंतर विराट कोहलीचे समर्थन करण्यासाठी अनेक खेळाडू पुढे आले.
आता विराट कोहलीने देखील बाबर आझमच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली म्हणतो, 'आभारी आहे. असाच चमकत रहा, प्रगती करत रहा. तुला खूप खूप शुभेच्छा.'
बाबर आझमने हे ट्विट पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी केले होते. या ट्विटबाबत बाबर आझम म्हणाला की, 'मी स्वतः एक खेळाडू आहे. मला माहिती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या परिस्थितीतून जाऊ शकता. अशा परिस्थिती खेळाडूला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे देखील माहिती आहे. या कठिण काळात तुम्हाला पाठिंब्याची गरज असते. मी ट्विट केले कारण मला असे वाटले की यामुळे त्याला थोडा पाठिंबा मिळेल. तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.'
बाबर आझम पुढे म्हणाला की, 'तो खूप क्रिकेट खेळला आहे. अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे त्याला माहिती आहे. या गोष्टीला वेळ लागतो. तुम्ही जर खेळाडूला पाठिंबा दिला तर ते त्याच्यासाठी खूप चांगले असते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.