Virat Kohli Rohit Sharma esakal
क्रीडा

IND vs ENG : दोन दिग्गजांना मिळणार ब्रेक; विराट अयोध्येला जाण्यासाठी तर रोहित शर्मा...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Virat Kohli Rohit Sharma : भारतीय संघाने अफगाणिस्तान विरूद्धची मालिका 3 - 0 ने जिंकली. टी 20 वर्ल्डकपपूर्वीची ही भारतीय संघाची शेवटची टी 20 मालिका आहे. आता भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या WTC फायनलसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

दरम्यान, भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळले. आता कसोटी मालिकेपूर्वी त्यांना दोन दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे. बंगळुरू येथील तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली थेट घरी पोहचले आहेत. आता ते कसोटी संघासोबत 20 जानेवारीला जोडले जाणार आहे.

विराट कोहली सोडून भारतीय प्रशिक्षक स्टाफमधील राहुल द्रविड यांना देखील ब्रेक मिळणार आहे. राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ देखील शनिवारी हैदराबाद येथे दाखल होणार आहे.

रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ते आता कसोटी मालिकेपूर्वीच्या चार दिवसाच्या सराव सत्रात दाखल होणार आहेत. भारतीय संघ या कॅम्पमध्ये एक सराव सामना देखील खेळणार आहे.

विराट कोहलीला 22 जावेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे. यासाठी विराट कोहलीने बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे.

पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत(यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल(यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT