England vs India : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका सुरू आहे. गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या कोहलीवर बरीच टीका होत आहे. दरम्यान अनेक जाणकारांच्या मते धावांच्या दुष्काळातून जाणाऱ्या विराट कोहलीला जर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये स्थान टिकवायचे असेल तर त्याच्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरील वनडे मालिका शेवटीची आशा आहे.(Virat Kohli sends strong message to critics through social media post eng vs ind)
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर लिहिले, मी पडलो, तर काय? ओह बट माय डार्लिंग, जर तू झेप घेतली तर काय? बाहेर सुरु असलेल्या चर्चांवर विराटने उपरोधिकपण भाष्य केल आहे. पण या सगळ्यामध्ये तो सकारात्मक असल्याचं सुद्धा या पोस्ट मधून दिसूण येत आहे.
कोहलीचा फॉर्म चाहत्यांसाठी आणि तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीला आता संघातून डच्चू देण्यात यावा अशी मागणी केली आहे. कपिल देव यांनी देखील विराटचे स्टारपण न पाहता त्याला आता बेंचवर बसवून नव्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी असे परखड मत व्यक्त केले होते. इरफान पठाण आणि व्यंकटेश अय्यर यांसारख्या माजी भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे की विश्रांती घेताना कोणीही फॉर्ममध्ये येत नाही.
इंग्लंड दौऱ्यावरही कोहलीची बॅट शांत आहे. या दौऱ्यात त्याने आतापर्यंत 11, 20, 1, 11 आणि 16 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेतून विश्रांती घेतली आहे. विराटला ब्रेकवर जाण्यापूर्वी इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपला फॉर्म पुन्हा परत आणण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.