Virat Kohli Should Go To Domestic Cricket Get Form Syed Kirmani esakal
क्रीडा

Virat Kohli : माजी खेळाडूने कान टोचले; घरी जा, रणजी खेळ मग बघू ....

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील वनडे मालिका सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नाही. दरम्यान, अनेक जाणकारांच्या मते धावांच्या दुष्काळातून (Virat Kohli Batting Form) जाणाऱ्या विराट कोहलीला जर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये स्थान टिकवायचे असेल तर त्याच्यासाठी इंग्लंड दौऱ्यावरील वनडे मालिका शेवटीची आशा आहे. टी 20 मालिकेत विराट फेल गेल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.

अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीला आता संघातून डच्चू देण्यात यावा अशी मागणी केली आहे. कपिल देव यांनी देखील विराटचे स्टारपण न पाहता त्याला आता बेंचवर बसवून नव्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी असे परखड मत व्यक्त केले होते. आता त्यांच्या सुरात सूर मिसळत भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी (Syed Kirmani) यांनी देखील विराट कोहलीला सल्ला दिला.

सय्यद किरमानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'सध्याच्या क्रिकेट युगात खूप प्रतिस्पर्धा वाढली आहे. तुम्ही जर काही डावात धावा केल्या नाहीत आणि जरी तुम्ही कितीही मोठे अनुभवी खेळाडू असला तरी निवड समिती त्यांचा निर्णय घेऊ शकते. आता खूप झालं, देशांतर्गत क्रिकेटमध्ये परत जा, फॉर्म परत मिळव त्यानंतर आम्ही भारतीय संघात पुन्हा स्थान देऊ शकतो का हे पाहू. हे विराट कोहलीवर लागू का होणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT