Virat Kohli Changed Mindset IND vs SL 1st OD esakal
क्रीडा

Virat Kohli : मी कायम खेळत राहणार नाही... पाठोपाठच्या दोन शतकानंतरची 'विराट' प्रतिक्रिया व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Changed Mindset IND vs SL 1st ODI : भारताने श्रीलंकेविरूद्धचा पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला. आजच्या सामन्यात दोन शतके झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून विराट कोहलीनं (113) शतक ठोकलं. तर धावांचा पाठलाग करतानादसुन शानकानं 108 धावांची नाबाद झुंजार खेळी केली. मात्र शानकाची ही खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. लंकेचा 67 धावांनी पराभव झाला.

सामना झाल्यानंतर सामन्याचा मानकरी म्हणून 87 चेंडूत 113 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या विराट कोहलीचीच निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर समालोचकांनी विराट कोहलीला त्याने बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी आपल्या मानसिकतेत कोणता बदल केला असा प्रश्न विचारला.

यावेळी विराट कोहली म्हणाला की, 'मी काही वेगळं केलं नाही. माझी तयारी आणि इच्छाशक्ती जशी आधी असायची तशीच होती. आज मला वाटले की मी चेंडू चांगल्या प्रकारे टोलवत आहे. मी जसा आधी खेळत होतो तसा खेळतोय. मला माहिती होतं की आम्हाला या विकेटवर 25 ते 30 अधिकच्या धावा कराव्या लागणार आहेत कारण नंतर मैदानावर दव पडतं. त्यामुळे मी संघाला चांगली टोटल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.'

बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी आपल्या मानसिकतेत कोणता बदल केला याचाबाबतही विराट कोहली व्यक्त झाला. तो म्हणाला की, 'मी या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट शिकलो की डेस्परेशन तुम्हाला कोठेही घेऊन जात नाही. तुम्हाला गोष्टी अवघड करण्याची गरज नसते. तुम्ही मैदानावर जात मुक्तपणे खेळणे गरजेचे असते. स्वतःसाठी खेळावे लागते.'

विराट पुढे म्हणाला, 'तुम्ही योग्य कारणासाठी खेळणे गरजेचे असते. दुसऱ्यांच्या अपेक्षांसाठी खेळणे गरजेचे नाही. तुम्ही अशा पद्धतीने खेळा की हा तुमचा शेवटचा सामना आहे आणि आनंदाने खेळा. खेळ सतत पुढे जात राहणार. मी काही कायम खेळतच राहीन असे नाही. आता मी आनंदी आहे माझ्या खेळाचा मी आनंद घेत आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT